अतिक्रमण हटवायला गेले असता महिलेने लावला स्वतःच्या पोटाला चाकू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 21:29 IST2020-12-28T21:28:38+5:302020-12-28T21:29:49+5:30
महिलेच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भंबेरी उडली

अतिक्रमण हटवायला गेले असता महिलेने लावला स्वतःच्या पोटाला चाकू
ठळक मुद्देमहिलेच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भंबेरी उडली
यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड येथे इ क्लास जमिनीवर काही महिलांनी राहुटी टाकून अतिक्रमण केले .या घटनेची माहिती मिळताच महसूल कर्मचारी आणि पोलीस हे लवाजम्यासह अतिक्रमण स्थळी पोहचले . याचा विरोध करीत अतिक्रमण करणाऱ्या महिलेने चक्क स्वतःच्या पोटाला चाकू लावला. तसेच,अतिक्रमण हटविल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली.
महिलेच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भंबेरी उडली. या महिलेचा रुद्रावतार बघून शेवटी हतबल होऊन कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने वापस फिरावे लागले. या प्रकाराची शहरात चांगलीच चर्चा सुरु आहे.