शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

जिथे अधिक व्हायचे तिथे आता होत आहे सगळेच उणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 1:50 PM

विदर्भात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात कोसळतो. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे.

ठळक मुद्देहमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांताकडे मान्सूनने फिरवली पाठ शेतकऱ्यांवर अस्मानी संकट मराठवाड्याची चिंता आता विदर्भाच्या वाट्याला

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हमखास पाऊस बरसणारा प्रांत म्हणून यवतमाळची राज्यात ओळख आहे. अस्मानी संकटाने यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांची ही ओळख पुसून काढली आहे. कमजोर मान्सूनने या जिल्ह्याचा घात केला आहे. मान्सूनमध्ये भरपूर पाऊस असणाऱ्या ठिकाणी आता उणे नोंद झाली आहे.विदर्भात सर्वाधिक पाऊस कोसळतो. त्यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे. हवामान अभ्यासकांनी या घटनेला ‘विक मान्सून’ जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

या स्थितीत ढगाचे अल्प प्रमाण असते. वाऱ्याचा वेग ताशी ३ ते ४ किमी असतो. हवेत बाष्प नसते. यामुळे काही पॅचमध्ये हा पाऊस पडतो. तर काही ठिकाणी पडत नाही. वाºयाचा वेग ताशी ४० ते ५० असेल आणि बाष्प घेऊन येणारे समुद्राचे वारे असेल तर पाऊस हमखास बरसतो. तशी स्थितीत विदर्भावर निर्माण होण्याची प्रक्रिया गत दोन वर्षात प्रारंभीच्या काळात मंदावली आहे. या ठिकाणावरून मान्सूनचे वारे ‘डिव्हाईड’ होत आहे. इतर ठिकाणी मान्सूनच्या वाऱ्याचा वेग तीव्र आहे.संपूर्ण जून महिना संपला, मात्र पावसाची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. १७ दिवसांपासून पावसाचा खंड आहे. परिणामी यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या उणे ३३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात सरासरीच्या उणे २८ टक्के कमी पाऊस झाला आहे. गोंदियाला उणे २४ टक्के पाऊस झाला आहे. वर्धेत ८ टक्के कमी पाऊस आहे. चंद्रपूरमध्ये १२ टक्के कमी, गडचिरोलीत १२ टक्के कमी, तर साताऱ्यात ८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पालघरमध्ये उणे ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. ठाण्यात २६ टक्के कमी पाऊस झाला आहे. मुंबई शहरात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला. रायगडमध्ये २२ टक्के कमी पाऊस झाला.आता या कमी पावसाने कृषी क्षेत्र अडचणीत आले आहे. पीक नाजूक अवस्थेत आहे. अशा स्थितीत उन्हाचा पारा ३६ अंशापर्यंत वर चढला आहे. तर पीक मान टाकत आहे. यामुळे शेतकरी १७ दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा खंड पडत होता. आता विदर्भ आणि मुंबईच्या क्षेत्रात पावसाचा खंड पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.हवामानाचा पुन्हा अंदाज खरा ठरेल काय?हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ३, ४ आणि ५ जुलैला पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी वर्तविलेला पावसाचा अंदाज फेल ठरला आहे. यामुळे यावेळचा अंदाज नक्की खरा ठरेल काय, यावर साशंकता व्यक्त होत आहे.सहा जिल्ह्यात क्षमतेपेक्षा ६० टक्के अधिक पाऊससहा जिल्ह्यात क्षमतेच्या ६० टक्के अधिक पाऊस पडला आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना, अहमदाबाद, बिड, सोलापूर, लातूर या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडला आहे. १२ जिल्ह्यात २० टक्के अधिक पाऊस पडला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि वाशिममध्ये चांगल्या पावसाची नोंद २ जुलैला हवामान विभागाने केली आहे. ६ जिल्ह्यात जेमतेम पाऊस पडला आहे. यामध्ये अमरावती, नांदेड, नागपूर, भंडारा, रत्नागिरी आणि नंदूरबार जिल्ह्याचा समावेश आहे.विदर्भाला विक मान्सूनचा फटका बसला आहे. पुढील तीन दिवस चांगला पाऊस वेधशाळेने वर्तविला आहे. कमी पावसाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला.- सुरेश चोपने, हवामान अभ्यासक

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊस