शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिनिंगच्या मूल्यांकनातच तफावत, बेभाव लिलावावर राजकीय पक्ष गप्प का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 04:54 IST

यवतमाळ सहकारी जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीची सुमारे २४ कोटी रुपये किंमतीची आठ एकर जमीन अवघ्या सात कोटीत विकली जात आहे.

यवतमाळ : यवतमाळ सहकारी जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीची सुमारे २४ कोटी रुपये किंमतीची आठ एकर जमीन अवघ्या सात कोटीत विकली जात आहे. या जिनिंगच्या मूल्यांकनातही प्रचंड तफावत आढळून आली आहे. धामणगाव रोड स्थित यवतमाळ सहकारी जिनिंगच्या आठ एकर जमिनीची किंमत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्हॅल्युअरने दहा कोटी निश्चित केली आहे. दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयाने रेडीरेकनरनुसार जमिनीचे मूल्यांकन साडेआठ कोटी नोंदविले. तर सरकारी व्हॅल्यूअरने ही किंमत १३ कोटी सांगितली आहे. प्रत्यक्षात रियल इस्टेटमधील ब्रोकर्सच्या अंदाजानुसार २४ कोटी आहे. त्यामुळे नेमकी किंमत किती याचा संभ्रम निर्माणझाला असून हे मूल्यांकनही मॅनेज केल्याचा संशय आहे. वणी येथील वसंत सहकारी जिनिंगचा चार वर्षांपूर्वी लिलाव झाला असता सात एकर जमिनीला तब्बल २१ कोटी रुपये मिळाले होते, हे विशेष.>बँकेचे अध्यक्ष भाजपाचे, संचालक काँग्रेस-राष्ट्रवादीचेसहकारी जिनिंगच्या जमिनीच्या लिलावात भाजपाकडे अध्यक्षपद असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वाची भूमिका वठविली आहे. आपल्या साडेसहा कोटींच्या कर्जवसुलीच्या आड या जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया अत्यंत छुप्या पद्धतीने राबविली गेली. त्यामुळेच बँकेच्या संचालक मंडळाकडे संशयाने पाहिले जात आहे. सहकारी जिनिंगच्या जमिनीची बेभाव विक्री होत असताना सत्ताधारी भाजपा, शिवसेना तसेच विरोधी बाकावरील काँग्रेस व राष्टÑवादीने अद्याप ‘ब्र’सुद्धा काढला नाही. ते पाहता या पक्षांचा तर या व्यवहाराला पाठिंबा नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. जिल्हा बँकेवर गेली कित्येक दशके काँग्रेस व राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. सध्याही बहुतांश याच पक्षांचे संचालक आहेत. तीन संचालकांच्या बळावर बँकेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे.>आणखी २२ एकर जागेवर नजरयवतमाळ सहकारी जिनिंगच्या मागील बाजूला २२ एकर जागा आहे. शासनाने ती यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली आहे. या जागेवर बिल्डर लॉबीचा डोळा आहे. त्यासाठी बाजार समितीचे संचालक मंडळ काही काळापुरते का होईना हटविणे, तेथे प्रशासक बसविणे व त्या माध्यमातून आपल्या सोईचे पत्रव्यवहार करून घेणे, पुढे या जागेचा वापर आपल्या सोईने बदलवून लिज मिळविणे, असा या सत्ताधारी बिल्डर लॉबीचा अजेंडा असल्याचे सांगितले जाते.