शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाना वाचविण्याची धडपड आताच का?

By admin | Updated: January 21, 2016 02:21 IST

सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही.

महागाव : सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही. आता राज्य बँकेने साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केली आणि खडबडून जागे झालेल्या काहींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कारखाना वाचविण्यासाठी आताच का धडपड, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे.महागाव तालुक्यातील गुंज येथे सुधाकरराव नाईक साखर कारखाना २०१२ सालापासून बंद आहे. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले शेतकरी, कामगार आर्थिक विवंचनेत सापडले आहे. गेल्या चार वर्षात कारखाना सुरू करावा, यासाठी कुणीही प्रयत्न केले नाही. कारखाना सुरू असताना आंदोलने करून प्रशासनाला सळो की पळो करण्यात आले. त्यानंतर वारणा ग्रुपने भाडेतत्त्वावर कारखाना घेतल्यानंतर त्यांनाही हा कारखाना अर्ध्यावरच करार मोडावा लागला. त्यानंतर कारखान्याला कायमचे टाळे लागले ते आजपर्यंत कायम आहे. दरम्यान, थकीत कर्जासाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतला. कारखाना विकण्याची नोटीस काढली. दरम्यानच्या चार वर्षात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाही किंवा आंदोलने केले नाही. मात्र कारखाना विक्रीला निघत असल्याचे पाहून अनेकांनी आंदोलनाची भाषा केली. परंतु त्यातही नेते मात्र बाजूलाच दिसत आहे. कारखाना वाचविण्यासाठी बैठा सत्याग्रह करण्यात आला. परंतु या सत्याग्रहालाही शेतकऱ्यांचा आणि नेत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एकही नेता बैठा सत्याग्रहाकडे फिरकला नाही. आता आमदार मनोहरराव नाईकांना निवेदन देवून कारखाना वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे निवेदन दिल्या गेले. मात्र हा कारखाना विक्रीस काढल्यावर जाग का आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारखाना सुरू व्हावा, अशी प्रत्येकाचीच भावना आहे. त्यासाठी राजकारणविरहीत प्रयत्न होण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)