Welcome to Shiva Swarajya Yatra at Darva, Arni | शिवस्वराज्य यात्रेचे दारव्हा, आर्णी येथे स्वागत
शिवस्वराज्य यात्रेचे दारव्हा, आर्णी येथे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा/आर्णी : प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे दारव्हा, बोदेगाव, बोरीअरब, आर्णीसह विविध ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी नेत्यांनी ठिकठिकाणच्या सभेत यात्रेला संबोधित केले.
दारव्हा येथील यात्रेच्या निमित्ताने झालेल्या सभेच्या व्यासपीठावर अजित पवार, धनंजय मुंडे, डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री सुभाष ठाकरे, अनिल देशमुख, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, अ‍ॅड. आशीष देशमुख, अ‍ॅड. शंकरराव राठोड, उत्तमराव शेळके आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी नेत्यांनी विविध मुद्यांना हात घालताना युती सरकारवर आसूढ ओढले. पाच वर्षात भाकरी करपली त्यामुळे आता भाकरी फिरवा, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले. उद्धव ठाकरे आमदार-खासदारांना महालक्ष्मी दर्शनाला नेतात. मात्र ज्या पूरग्रस्त भागाने दहा आमदार दिले तिकडे फिरकायला शिवसेनेला वेळ नाही, अशी टीका कोल्हे यांनी केली. यावेळी दारव्हा येथील सभेचे आयोजक वसंत घुईखेडकर यांनी प्रास्ताविक केले. अमोल मिटकरी व क्रांती राऊत यांनीही विचार मांडले. संचालन हरिश कुडे, आभार प्रा. चरण पवार यांनी मानले.
आर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत केले. यावेळी नेत्यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका केली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी केले. यावेळी रवी नालमवार, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, तालुकाध्यक्ष हरिश कुडे, शहराध्यक्ष राजेंद्र शिवरामवार, बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील, चिराग शहा, नगरसेविका अंजली खंडार, नीलंकुश चव्हाण, ज्योत्स्ना ठाकरे, उमा शिवरामवार, शंकर वाघमारे, यासीन नागानी, उमेश ठाकरे, सुनील पोटगंदलवार, संदीप बुटले, परवेज मिर्झा, संजय व्यवहारे, शंकर चव्हाण, मुबारक तंवर, सुनील राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार आर्णी तालुकाध्यक्ष हरिश कुडे यांनी मानले.
 


Web Title: Welcome to Shiva Swarajya Yatra at Darva, Arni
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.