शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टर पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST

यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता खरीप हंगामात सोयाबीनवर कपाशीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

यवतमाळ : यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता खरीप हंगामात सोयाबीनवर कपाशीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु आॅक्टोबरमधील प्रचंड गर्मी आणि पावसाने वेळेवर मारलेली दडी यामुळे सोयाबीन व कापूस ही जिल्ह्यातील मुख्य पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. एकीकडे शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था असताना शासनाचे अधिकारी कर्मचारी निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सध्या कुणाचेही लक्ष नाही. यावर्षी सुरूवातीला काही प्रमाणात पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर पावसाने लांबलचक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणी संकट कोसळले. यातून शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होत कशाबशा पेरण्या आटोपल्या. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु आता पुन्हा एकदा पावसाने दगा दिला. त्यातच वापश्याच्या महिन्यामुळे पिके करपायला लागली आहे. विविध किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर, कापूस पिकांवर दिसून येत आहे. अनेकांच्या शेतात जमिनीला भेगा पडल्या आहे. सिंचानाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी भारनियमनाचा सामना करीत कसीबसी आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही पूर्णपणे यश आलेले दिसत नाही. जुन, जुलैमध्ये दडी मारलेल्या पावसाने खरीपातही वाताहत केली. आगस्टच्या मध्यात कोसळलेल्या पावसाने खरीप पिकांमध्ये काहीप्रमाणात सुधारणा दिसून आली होती. अनेकांच्या शेतात डोलणाऱ्या हिरव्यागार पिकांमुळे शेतकऱ्यांच्या आकांक्षांना पिकांबरोबरच पालवी फुटली होती. परंतु त्यानंतर पोळ््यापासून आतापर्यंत पावसाने त्यांची मोठी निराशा केली, त्यामुळे पिके करपून गेली. आॅक्टोबरमध्ये वाढत्या तापमानामुळे शेतांना प्रचंड भेगा पडून खरीप पिकांची दयनीय अवस्था झाली आहे. सोयाबीन काढणीला येत असतानाच आता त्याची दाणी भरण्याची क्षमता मंदावली आहे. त्यामुळे सोयाबीनचे जिल्ह्यातील हजारो हेक्टेर पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. (प्रतिनिधी)