यवतमाळ जिल्ह्यातील वणीनजीक टरबुजाचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:59 IST2020-05-20T15:59:04+5:302020-05-20T15:59:46+5:30

नांदेडवरून चंद्रपुरकडे टरबूज घेऊन जाणारा ट्रक बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वणी-घुग्घूस मार्गावरील पुनवट गावालगत उलटला.

A watermelon truck overturned near Wani in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील वणीनजीक टरबुजाचा ट्रक उलटला

यवतमाळ जिल्ह्यातील वणीनजीक टरबुजाचा ट्रक उलटला

ठळक मुद्दे८० हजारांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: नांदेडवरून चंद्रपुरकडे टरबूज घेऊन जाणारा ट्रक बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वणी-घुग्घूस मार्गावरील पुनवट गावालगत उलटला. सुदैवाने या अपघातात प्राणहानी झाली नाही. मात्र टरबुजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नांदेड येथील काही शेतकऱ्यांचे टरबूज एकत्रित ट्रकद्वारे चंद्रपूर येथील व्यापाºयाला विकण्यासाठी नेत असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात शेतकऱ्यांचे ८० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: A watermelon truck overturned near Wani in Yavatmal district

टॅग्स :Accidentअपघात