शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

जिल्ह्यातील ५५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: December 29, 2014 02:07 IST

जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सरासरींपेक्षा २० टक्के पर्जन्यमान घटले आहे. यामुळेच तब्बल नऊ तालुक्यात भुजल पातळी कमी झाली आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सरासरींपेक्षा २० टक्के पर्जन्यमान घटले आहे. यामुळेच तब्बल नऊ तालुक्यात भुजल पातळी कमी झाली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची झळ बसणार आहे. ५५ गावे पाणीटंचाईच्या सावटात असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. यासाठी पाच कोटी ७० लाखांचा उपाययोजना आराखडाही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालानुसार नेर, यवतमाळ, आर्णी, केळापूर, कळंब, दिग्रस, उमरखेड, राळेगाव या नऊ तालुक्यांमध्ये भुजल पातळीत घट झाली आहे. तर बाभूळगाव, दारव्हा, वणी, मारेगाव, पुसद, महागाव या सात तालुक्यात मागील पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा भुजल पातळीत वाढ झाली आहे. या स्थितीत ही पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत कळंब, उमरखेड, दिग्रस, घाटंजी, आर्णी, नेर, यवतमाळ या सात तालुक्यातील ५५ गावात पाणीटंचाई भासणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यासाठी ४५ टॅँकर लागणार आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर टंचाई आराखडे तयार करण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच बहुतांश गावात पाणीटंचाई भासणार आहे. मागील वर्षी १८ गावे व एका वाडीवर १६ टॅँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. जिल्ह्याच्या जलाशयातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन यंत्रणेला पाणीटंचाई कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. २०१४-१५ मध्ये १०० नवीन विंधन विहिरी, ८४ विशेष नळ योजना दुरूस्ती, १५ तात्पुरत्या नळयोजना, ५० विंधन विहीर दुरूस्ती, २४० विहिरींचे अधिग्रहण, २० विहिरींचे खोलीकरण करणे या उपाययोजनांचा समावेश संभाव्य टंचाई आराखड्यात करण्यात आला आहे. डिसेंबर महिना संपायचा असला तरी कडाक्याच्या थंडीतच येणाऱ्या पाणीटंचाईच्या झळांची दाहकता प्रशासकीय यंत्रणेला जाणवत आहे. त्याच दृष्टिकोणातून उपाययोजनांचे नियोजन केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)