शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:42 IST

राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देचार हजार टँकरने पाणी पुरवठा२४ जिल्ह्यांची स्थिती बिकट, चारा छावण्या वाढताहेत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. चार हजार टँकरच्या मदतीने गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने चारा छावण्या उघडल्या जात आहे. पुढील महिन्यात या छावण्याची संख्या वाढणार आहे.पाणीटंचाईची सर्वाधिक भीषण स्थिती औरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागाची आहे. या भागामध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने जलाशयाची पातळी झपाट्याने खाली जात आहे. राज्यात उन्हाचा पारा ४५ अंशापर्यंत वर चढला आहे. चंद्रपूरमध्ये हा पारा वाढला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती अशीच आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. जनजीवनही प्रभावित झाले आहे.२४ जिल्ह्यामध्ये ही भीषण स्थिती आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. या ठिकाणी १६२६ गावे आणि ५७० वाड्यामध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी दोन हजार १८५ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.नाशिकमधील ७६३ गावे, ३०३९ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील ५०६ गावे, ३३६२ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. कोकणातील ६८ गावे आणि १८८ वाड्यांना ५७ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. अमरावती विभागातील १४६ गावांना १५३ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. नागपूर विभागातील एका गावात एका टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यात चार टँकरयवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी ५ कोटींच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासानाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील चार गावांमध्ये चार टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. १२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पुढील महिन्यात ही संख्या वाढण्याचा धोका आहे.चाऱ्याअभावी जनावरे विक्रीलाराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनावरांना लागणारा उपयुक्त चाराच उपलब्ध नाही. यामुळे छावण्या उघडाव्या लागतील आणि चारा विकत घ्यावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई