शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

वणीत पाण्यासाठी युद्धाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:19 IST

भीषण पाणी टंचाईच्या मुद्यावरून वणीत युद्धाची वेळ निर्माण झाली आहे. निर्गुडा नदी कोरडी पडल्याने गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात नळाद्वारे पाणी पुरवठा बंद आहे. मात्र पालिकेच्यावतीने शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देदोन ठिकाणी राडा : ट्युबवेलवरून पाणी घेण्यास महिलांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : भीषण पाणी टंचाईच्या मुद्यावरून वणीत युद्धाची वेळ निर्माण झाली आहे. निर्गुडा नदी कोरडी पडल्याने गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात नळाद्वारे पाणी पुरवठा बंद आहे. मात्र पालिकेच्यावतीने शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. असे असले तरी गेल्या २४ तासांत ट्युबवेलवरून पाणी उपसा करण्यास संबंधित परिसरातील नागरिकांनी विरोध केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दररोज टँकरद्वारे विविध भागात पाणी पुरवठा केला जात आहे. सदर पाणी टागोर चौैकातील ट्युबवेल व वासेकर ले-आऊट, भीमनगर या भागाची तहान भागविणाºया नदीकाठावरील ट्युबवेलवरून सातत्याने पाण्याचा उपसा केला जात होता. शुक्रवारी रात्री याच मुद्यावरून वासेकर ले-आऊट व भीमनगरमधील महिला-पुरूष रस्त्यावर उतरले. सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे, किशोर मून, राजेंद्र खोब्रागडे, संतोष पेंदोर शेकडो महिला नदी काठावरील ट्युबवेलवर पोहचल्या. तेथे चार टँकरमध्ये ट्युबवेलमधून पाणी भरणे सुरू होते. यावर आक्षेप घेत नागरिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना फोन करून घटनास्थळी येण्याबाबत सांगितले. मात्र ते अखेरपर्यंत तेथे पोहचले नाही. भीमनगर व वासेकर ले-आऊट या भागात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा होत नाही. नदीकाठावरील दोन ट्युबवेलचेच पाण्यावर या दोन भागाची तहान भागते. त्यामुळे केवळ याच ट्युबवेलचे नाही तर शहरातील अन्य ट्युबवेलवरूनदेखील पाणी घ्यावे, अशी मागणी या नागरिकांनी केली. नागरिक मुख्याधिकाºयांची प्रतीक्षा करीत होते. मात्र मुख्याधिकारी आले नाहीत. काही वेळाने पोलिसांचा ताफाच तेथे पोहोचला. नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर पोलिसांनी टँकरमध्ये पाणी भरण्याची प्रक्रीया थांबविली. त्यानंतर महिला व नागरिक परत आलेत.शनिवारीदेखील सकाळी वणीतील टागोर चौैकात पाण्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी सायंकाळी प्रभाग आठमधील नागरिक व महिलांनी टागोर चौैकातील ट्युबवेलवरून प्रभाग आठमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जोडणी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुवार यांना टागोर चौैकात पाचारण करण्यात आले. सदर ट्युबवेल ही प्रभाग आठसाठी मंजूर आहे. मात्र या ट्युबवेलवरून टँकरने पाणी घेणे सुरू आहे. परिणामी प्रभाग आठमधील नागरिकांना या ट्युबवेलचे पाणी मिळत नव्हते. नागरिकांच्या बोलावण्यावरून आमदार बोदकुरवार टागोर चौकात पोहचले. त्यांनी कागदपत्राची पाहणी करून मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना टागोर चौैकात पाचारण करून सदर ट्युबवेलचे पाणी टँकरद्वारे उपयोगान आणत या ट्युबवेलद्वारे प्रभाग आठमध्ये पाणी पुुरवठा करण्यासाठी जोडणी करण्याच्या सूचना केल्या.दरम्यान, शनिवारी सकाळी आ.बोदकुरवार यांच्या निर्णयावर प्रभाग सातमधील नागरिकांनी आक्षेप घेतला. विशेष म्हणजे ही ट्युबवेल प्रभाग क्रमांक सातच्या हद्दीत आहे. त्यामुळे या ट्युबवेलचे पाणी प्रभाग सातमध्ये सुद्धा पुरविण्यात यावे, अशी मागणी करीत प्रभाग सातमधील महिला व पुरूष टागोर चौैकात एकत्र आले. तेथे आमदारांच्या सुचनांना बगल देऊन तीन ते चार टँकरमध्ये पाणी भरणे सुरू होते. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी पुढे होऊन ट्युबवेलचा वीज पुरवठा खंडित केला व टँकरला तेथून हुसकावून लावले. या नागरिकांनी आमदार बोदकुरवार यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. आज दिवसभर या दोनही वादग्रस्त ट्युबवेलवरून टँकरसाठी पाणी घेतले नाही.आमदारांनी बोलावली विशेष बैठकवणी शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची बाब लक्षात घेऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शनिवारी दुपारी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांची विशेष बैैठक बोलाविली. या बैठकीत काही नगरसेवकांनी टँकरने पाणी पुरवठा हा पाणी टंचाईवर पर्याय ठरू शकत नाही, असा मुद्दा मांडला. त्यावर आमदारांनी सहमती दर्शविली. नदीच्या काठावर जेथे-जेथे ट्युबवेल तयार करता येतील, तेथे ट्युबवेल मारून त्याद्वारे टाकीत पाणी घेऊन नंतर त्याचे वितरण केले जाईल, असे बैैठकीत ठरले. तसेच राजूर खाणीतून जोडलेल्या पाईपलाईनचे लिकेजस तातडीने दुरूस्त करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. बैैठकीला नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासह सर्व नगरसेवक व सभापती उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी