शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

वणी, पांढरकवडा विभागात अवकाळी पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी परिसरात अचानक ढगाळी वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटाला सुरूवात झाली. काहीच वेळात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतशिवारात काम करित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची चांगलीच धांदल उडाली. काही शेतामध्ये गहू, हरभराची कापणी होऊन पिकाचे ढिगारे उभे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही फटका : गहू, हरभरा पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सोमवारी दुसºयाही दिवशी वणी व पांढरकवडा विभागात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात कापणी करून ठेवलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली.दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी परिसरात अचानक ढगाळी वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटाला सुरूवात झाली. काहीच वेळात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतशिवारात काम करित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची चांगलीच धांदल उडाली. काही शेतामध्ये गहू, हरभराची कापणी होऊन पिकाचे ढिगारे उभे करण्यात आले आहे. त्याला पाणी लागू नये म्हणून शेतकरी धावपळ करित होते. मारेगाव परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सोमवारी मारेगावचा बाजार होता. पाऊस सुरू झाल्याने बाजारहाटासाठी आलेले नागरिक व व्यापाºयांची चांगलीच धांदल उडाली. पांढरकवडा उपविभागात पांढरकवडा तालुक्यातील वाºहा कवठा परिसरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे हरभरा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे अर्धा तास हा पाऊस कोसळला. अनेक शेतकºयांची हरभरा पिकाची कापणी झाली असून मळणीसाठी पिकाचे ढिग शेतात उभे केले होते. परंतु अचानक आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कमल राऊत, नारायण कोरेवार, शुभम डंभारे, निता डंभारे, मधुकर अडगुलवार, माधव डंभारे या शेतकºयांना पावसाचा फटका बसला. झरी तालुक्यातही सोमवारी दुपारी अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे होळी सणावर विरजण पडले. वेचणी न झालेल्या कापसालाही या अवकाळी पावसाचा चांगला फटका बसला.

 

टॅग्स :Rainपाऊस