शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

रेड झोन गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

पैनगंगा नदी तीरावर असलेल्या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. पावसाळा आला की कागदी घोडे नाचविले जातात. मात्र पुनर्वसन होत नाही. तालुक्यातील रेडझोनमधील अनेक

उमरखेड (कुपटी) : पैनगंगा नदी तीरावर असलेल्या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. पावसाळा आला की कागदी घोडे नाचविले जातात. मात्र पुनर्वसन होत नाही. तालुक्यातील रेडझोनमधील अनेक गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही दुर्लक्ष करीत असल्याने पावसाळ्यात ही मंडळी जीव मुठीत घेऊन राहत आहे. उमरखेड तालुक्यातील बहुतांश गावे पैनगंगेच्या तीरावर आहे. दरवर्षी पैनगंगेला पूर येतो. डझनावर गावांना पुराचा तडाखा बसतो. अनेक गावातील नागरिक महापुराच्या वेढय़ात अकडून पडतात. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न तसाच रेंगाळत राहतो. तालुक्यातील पळशी, देवसरी, संगम चिंचोली येथील नागरिकांना २00६ साली महापुराचा फटका बसला. त्यानंतर पुनवर्सनाची आश्‍वासन देण्यात आले. १९५८ पासून २00६ पर्यंंत पुनर्वसनासाठी पाठपुरावा करण्यात आला. परंतु पुनर्वसन झाले नाही. पळशी, देवसरी, संगमचिंचोली या गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया लालफितीत अडकली आहे. खरे तर २00६ च्या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वर्षभरात पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु आता आठ पावसाळे झाले तरी पुनर्वसन झालेच नाही. अतवृष्टी आणि इसापूर धरणातील अतिरिक्त पाणी सोडण्यात येत असल्याने पैनगंगेला महापूर येतो. शेकडो एकर जमीन बाधित होते. नागरिक यात उद्ध्वस्त होतात. पुनर्वनासाठी अनेकदा उपोषणासह आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी राजकीय मंडळींनी आश्‍वासने दिली. प्रशासनाने त्यावेळी मान डोलावली. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. रेडझोनमधील गावांना महापुराचा फटका बसणार नाही, यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. पळशी, चिंचोली, मार्लेगाव, चातारी, देवसरी, खरूस, बंदी टाकळी, गाडीबोरी आदी गावांना महापुराचा फटका बसतो. यावर्षी पुन्हा पावसाळा तोंडावर आला आहे. मृग नक्षत्र सुरू झाले आहे. लवकरच पावसालाही सुरुवात होईल. नदी तिरावरील गावांमध्ये पुन्हा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. (वार्ताहर)