शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात सागवान तस्करांचे गाव

By admin | Updated: September 29, 2014 23:13 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी सुरू असून या तस्करीमागे तेलंगणातील सागवान तस्करांचा सहभाग असल्याचे वारंवार उघड झाले आहे.

अशोक काकडे - पुसद विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी सुरू असून या तस्करीमागे तेलंगणातील सागवान तस्करांचा सहभाग असल्याचे वारंवार उघड झाले आहे. वन विभागाच्या हाती एक टोळी लागली. तेव्हा तेलंगणात सागवान तस्करांचे गावच असल्याचे पुढे आले. निजामाबाद जिल्ह्यातील केशवपट्टणम असे या गावाचे नाव असून तेथे १० ते १२ टोळ्या कायमस्वरूपी कार्यरत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वन विभागात गेल्या काही वर्षांपासून सागवान तस्करीच्या मोठ्या कारवाया होत आहे. वाहनाद्वारे सागवानाची तस्करी केली जात आहे. या टोळ्यांना स्थानिक चोरट्यांचे सहकार्य असल्याने त्यांचे काम बिनबोभाटपणे होत आहे. नुकतीच एक टोळी वन विभागाच्या हाती लागली असून या टोळीमुळे सागवान तस्करीचे मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात होणाऱ्या सागवान तस्करीमागे तेलंगणातील टोळीचा हात असल्याचा संशय नेहमी व्यक्त केला जात होता. मात्र दोन दिवसापूर्वी सापडलेल्या टोळीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. वन अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. तेलंगणातील निजामाबादजवळील केशवपट्टणम असे सागवान तस्करांच्या गावाचे नाव आहे. या ठिकाणी दहा ते बारा टोळ्या कार्यरत असून त्यातील पाच टोळ्या महाराष्ट्रातून सागवानाची तस्करी करतात. तेलंगणातील सागवान तस्कर इतके सराईत आहे की, काही वेळातच ते सागवानाचे मोठे वृक्ष कापून वाहनाद्वारे नेतात. यांची चोरी करण्याची पद्धतही अजब आहे. वाहन घेऊन ते मराठवाडा मार्गे विदर्भाच्या जंगलात शिरतात. वाहन जंगलापासून दूर कुठे तरी धाब्यावर थांबविले जाते. अनेकदा तर वाहन पंक्चर असल्याचा देखावा निर्माण केला जातो. दोन-तीन तासात पद्धतशीरपणे सागवान कटाई केली जाते. दोन दुचाकीधारक अवतीभोवती निगराणी करीत असतात. जंगलात स्थानिक मजूर सागवान तोड करतात. परंतु याचा वन विभागाला थांगपत्ता लागत नाही. एकदा सागवान तोडले की काही वेळात वाहन जंगलाशेजारी आणून त्यात सागवान भरले जाते. त्यावर ताडपत्री टाकून कुटाराचे पोते ठेवले जातात. एकदा महाराष्ट्राची हद्दपार केली की तेलंगणात त्यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे या टोळ्यांचा शिरकाव महाराष्ट्रात वाढला आहे. या टोळ्यांमुळे विदर्भातील मौल्यवान सागवान मात्र नष्ट होत आहे.