पोलीस मुख्यालयात वाहनांनी घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:18+5:30
पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. काहींनी आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन बंब आल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मुख्यालयात शुक्रवारी सकाळीसुद्धा पोलीस क्वार्टरला आग लागली होती. वारंवार आगीच्या घटना कशा घडत आहे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलीस मुख्यालयात वाहनांनी घेतला पेट
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील पोलीस मुख्यालयातील शौचालय परिसरात कचरा पेटविण्यात आला. या कचऱ्याने चांगलाच पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. काही मिनिटातच विविध गुन्ह्यातील जप्त असलेल्या गाड्यांनी पेट घेतला. त्यामुळे शनिवारी सकाळी ११ वाजता दरम्यान एकच खळबळ उडाली.
पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. काहींनी आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन बंब आल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मुख्यालयात शुक्रवारी सकाळीसुद्धा पोलीस क्वार्टरला आग लागली होती.
वारंवार आगीच्या घटना कशा घडत आहे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्यालयातील जप्तीच्या वाहनांची किंमत लाखोंच्या घरात असताना या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत आगीच्या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकसानीचा तपशील अस्पष्ट आहे.