महावीर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

By Admin | Updated: April 2, 2015 00:01 IST2015-04-02T00:01:09+5:302015-04-02T00:01:09+5:30

भारतीय जैन संघटनेतर्फे महावीर जयंतीनिमित्त २ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले आहे.

Various programs today on Mahavir Jayanti | महावीर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

महावीर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

यवतमाळ : भारतीय जैन संघटनेतर्फे महावीर जयंतीनिमित्त २ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले आहे. यात अहिंसा रॅली, रक्तदान शिबिर, भक्तिसंध्या आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
स्थानिक माळीपुरा भागातील दिगंबर जैन मंदिरात सकाळी मंगल ध्वजारोहणानंतर प्रभातयात्रा काढली जाणार आहे. ९.३० वाजता अहिंसा संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मोटरसायकल रॅली येथील बोरा जैन धर्मस्थानकापासून निघणार आहे. संदेश रॅलीचा समारोप वाघापूर येथील महावीर दिगंबर जैन मंदिरात होणार आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ११ वाजता रुग्णांना फळवाटप केले जाईल. ११.३० वाजता आराधना भवनात रक्तदान शिबिर होणार आहे. सायंकाळी ७ वाजता केसरिया भवनात औरंगाबाद येथील सोनल-शितल संचेती यांची भक्तिसंध्या होणार आहे.
यावेळी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. यासोबत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. महोत्सवासाठी आयोजक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य पुढाकार घेत आहेत. (शहर वार्ताहर)

Web Title: Various programs today on Mahavir Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.