ज्योत्स्ना दर्डा स्मृती सखी मंचच्यावतीने विविध स्पर्धा

By Admin | Updated: June 10, 2015 02:34 IST2015-06-10T02:34:18+5:302015-06-10T02:34:18+5:30

महाराष्ट्रातील महिलांना स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ...

Various competitions by Jyotsna Darda Sakthi Sakhi Forum | ज्योत्स्ना दर्डा स्मृती सखी मंचच्यावतीने विविध स्पर्धा

ज्योत्स्ना दर्डा स्मृती सखी मंचच्यावतीने विविध स्पर्धा

१८ जूनला आयोजन : महिलांच्या कलागुणांना देणार चालना
यवतमाळ : महाराष्ट्रातील महिलांना स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकमत संखी मंचच्यावतीने १८ जून रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दर्डा मातोश्री सभागृहात दुपारी ३ वाजतापासून स्पर्धांना प्रारंभ होईल.
लोकमत सखी मंचच्या माध्यमातून ज्योत्स्ना दर्डा यांनी महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. महिला सक्षमीकरणात त्यांचे मोठे योगदान होते. १८ जून हा त्यांचा जन्मदिवस या दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सखी मंचने विविध स्पर्धा आयोजीत केल्या आहे.
भाषण स्पर्धा
दुपारी ३ वाजता भाषण स्पर्धा आयोजित आहे. स्पर्धेचा विषय ‘आधुनिकतेचा वाढता स्वैराचार’ असून, तीन मिनीटात आपले भाषण सादर करावे लागणार आहे. ही स्पर्धा केवळ सखी मंचच्या जुन्या आणि नवीन सदस्यांसाठी आयोजित असून, हावभाव, बोलण्याची पद्धत, मजकुर आदींवर गुण देण्यात येईल. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ११०० रुपये आणि व्दितीय बक्षीस ७०० रुपये देण्यात येईल.
केक सजावट स्पर्धा
दुपारी ३ वाजताच केक सजावट स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी केक घरून तयार करून आणि सजवून आणणे आवश्यक आहे. स्पर्धास्थळी मांडणीसाठी १० मिनीटांचा वेळ दिला जाईल. सजावट खाद्य पदार्थांपासून करणे आवश्यक असून, केकवर ‘हॅपी बर्थ डे’ लिहिने आवश्यक आहे. यात सजावट, स्वाद आणि नवीनता यावर गुण दिले जातील. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ११०० रुपये आणि व्दितीय बक्षीस ७०० रुपये देण्यात येईल.
रांगोळी स्पर्धा
याचवेळी दुपारी ३ वाजता रांगोळी स्पर्धा आयोजित आहे. ‘निसर्ग’ या विषयावर सखींना रांगोळी साकारावयाची आहे. दीड फुट बाय दीड फुट आकाराची जागेत स्पर्धास्थळी रांगोळी साकारावयाची आहे. रांगोळी काढण्यासाठी कोणत्याही वस्तुचा उपयोग करता येईल. या स्पर्धेसाठी स्पर्धकाला २५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. रंगसंगती, निटनेटकेपणा, नाविण्यता यावर गुण दिले जाईल. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य घरून आणणे आवश्यक आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ११०० रुपये आणि व्दितीय बक्षीस ७०० रुपये देण्यात येईल.
दिया सजाओ स्पर्धा
‘दिया सजाओ स्पर्धा’ दुपारी ५ वाजता घेण्यात येईल. सखींना या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य घरून आणावयाचे आहे. स्पर्धास्थळी दिव्याची सजावट करावयाची आहे. या स्पर्धेत केवळ दिवा आवश्यक असून, समयीचा उपयोेग करता येणार नाही. डेकोरेटीव्ह दिव्याच्या खाली ठेवण्यासाठी प्लेट आणणे आवश्यक आहे. दिवा सजविण्यासाठी एक बाय एक फूट आकाराची जागा दिली जाईल. सजावटीसाठी रांगोळी, पानाफुलांसह इतर वस्तुंचा उपयोग करता येईल. या स्पर्धेसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ७०० रुपये आणि व्दितीय बक्षीस ४०० रुपये देण्यात येईल.
‘भूले-बिसरे गीत’ गायन स्पर्धा
बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी दर्डा मातोश्री सभागृहात दुपारी ४ वाजता ‘भूले-बिसरे गीत’ गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत आठ ते १८ वयोगटातील केवळ मुली सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत फक्त फिल्मी हिंदी-मराठी जुनी गाणी सादर करावयाची आहे. यासाठी स्पर्धकांना तीन मिनीटांचा वेळ दिला जाईल. गाण्याचे स्वर, लयबद्धता, हावभाव आदींवर गुण दिले जातील. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ३००० रुपये आणि व्दितीय बक्षीस २००० रुपये देण्यात येईल. यावेळी वाद्यवृंदांची साथसंगत राहणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विजेतीला १८ जून रोजी संध्याकाळी प्रेरणास्थळ येथे आयोजित ज्योत्स्ना दर्डा स्मृती गायनाच्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याची संधी प्राप्त होणार आहे.
सर्व स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हाप्रमुख सीमा दर्डा (२४५०५०), अल्का राऊत (९९२२६६१४८७), छाया राठोड (२४४४७५), सुनीता भोयर (९४२२९२२७६६), लोकमत सखी मंच संयोजिका शैला मिर्झापुरे (९६७३७१३३१०) आणि लोकमत जिल्हा कार्यालय ‘पृथ्वीवंदन’, गांधी चौक, यवतमाळ (२४३११९, २४५११९) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Various competitions by Jyotsna Darda Sakthi Sakhi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.