शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य प्रशासनापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

जिल्ह्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या धोरणानुसार सध्या २१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आजपर्यंत पाच लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण आरोग्य यंत्रणेला पूर्ण करता आले नाही. 

ठळक मुद्दे३२ हजार लस जिल्ह्याकडे वळती : १६४ केंद्रांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याचे आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. यानंतरही जिल्ह्याला पाहिजे त्या प्रमाणात लस उपलब्ध झाली नाही. यामुळे आतापर्यंत केवळ २२ टक्के लसीकरण जिल्ह्याला पूर्ण करता आले आहे. अद्यापही ७८ टक्के लसीकरण बाकी आहे. या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून १६४ केंद्रांची निर्मिती करण्यात आली. आता लस उपलब्ध झाली तरच लसीकरण पुढे नेता येणार आहे. १६ लाख नागरिकांना लस देण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे आहे. जिल्ह्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या धोरणानुसार सध्या २१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आजपर्यंत पाच लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण आरोग्य यंत्रणेला पूर्ण करता आले नाही. दर आठवड्याला ४० ते ५० हजार लस उपलब्ध झाली, तर लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, दर आठवड्याला १८ ते २० हजार लस जिल्ह्याला उपलब्ध होत आहे. त्यातही कोव्हॅक्सिनचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे अनेकांना लसीकरण करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या आठवड्यात प्रथमच ३२ हजार लस जिल्ह्याकरिता पाठविण्यात आली आहे. याच पद्धतीने लस पाठविण्याची तसदी आरोग्य मंत्रालयाने घेतली तरच जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी ३० ते ४४ वयोगटांतील लसीकरणाची मोहीम दहा केंद्रांवर हाती घेण्यात आली होती. आता मंगळवारपासून १८ ते ४० आणि त्यापुढील सर्वच वयोगटाचे लसीकरण करण्याच्या सूचना धडकल्या आहेत.  नवीन सूचनेनुसार जिल्ह्यातील १६४ केंद्रांवर लसीकरण मोहीम पुढील काही दिवसांत राबविली जाणार आहे. मंगळवारपासूनच जिल्ह्यातील केंद्रांवर गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  

दुर्गम भागात अजूनही गैरसमज - जिल्ह्यातील दुर्गम भागात लस घेण्यासाठी नागरिक अजूनही पुढे येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विविध मोहीम हाती घेतल्या आहे. जाणीवजागृती करण्याचे काम राबविले जात आहे. मात्र, त्याला पाहिजे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे दिसून येते. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या