शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये लम्पी आजाराने पशुपालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

कृषी क्षेत्रावर उपजीविका असलेल्या उमरखेड तालुक्यात अनेक शेतकरी व पशुपालकांकडे पाळीव जनावरे आहे. या जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केले आहे. त्यामुळे जनावरे आजाराच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी व पशुपालक त्रस्त आहे. आधीच खरिप हंगामात शेतकरी संकटात सापडले होते. सुरुवातीला विलंबाच्या पावसाने पेरणी उलटली. त्यानंतर सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली.

ठळक मुद्देजनावरांना बाधा, ठिकठिकाणी लसीकरण, कोरोनाच्या सावटात पशुपालकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक संकटात सापडले आहे. त्यातच पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरावस्था झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहे.कृषी क्षेत्रावर उपजीविका असलेल्या उमरखेड तालुक्यात अनेक शेतकरी व पशुपालकांकडे पाळीव जनावरे आहे. या जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केले आहे. त्यामुळे जनावरे आजाराच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी व पशुपालक त्रस्त आहे. आधीच खरिप हंगामात शेतकरी संकटात सापडले होते. सुरुवातीला विलंबाच्या पावसाने पेरणी उलटली. त्यानंतर सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने पिकांना फटका बसला. आता जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केल्याने शेतकरी व पशुपालकांसमोर संकट उभे ठाकले आहे.तालुक्यातील गुरांचे दवाखाने मृतकप्राय दिसून येत आहे. मोबाईल दवाखान्यांचीसुद्धा तीच स्थिती आहे. पशुवैद्यकीय विभागाचा कारभार ढेपाळल्यागत दिसून येत आहे. त्यामुळे जनावरांवर उपचार करणे कठीण झाले आहे. अनेक जनावरांना लम्पीची बाधा झाल्याने जनावरे मृत होण्याची धास्ती पशुपालकांना सतावत आहे. लसीकरणाची मागणी होत आहे.लम्पी हा जनावरांमधील कोरोनाजनावरांना होणारा लम्पी आजार संसर्गजन्य आहे. कोरोनाप्रमाणेच संसर्गातून जनावरांना हा आजार बळावतो. त्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये तातडीने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.लसीकरणाची गरजलम्पी आजारामुळे तातडीने जनावरांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात काही ठिकाणी लसीकरण सुरूझाले आहे. मात्र बहुतांश जनावरे लसीकरणापासून अद्यापही दूर आहे. सर्व जनावरांचे तातडीने लसीकरण करावे अशी पशुपालकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Healthआरोग्यFarmerशेतकरी