उमरखेडमध्ये लम्पी आजाराने पशुपालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:17+5:30

कृषी क्षेत्रावर उपजीविका असलेल्या उमरखेड तालुक्यात अनेक शेतकरी व पशुपालकांकडे पाळीव जनावरे आहे. या जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केले आहे. त्यामुळे जनावरे आजाराच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी व पशुपालक त्रस्त आहे. आधीच खरिप हंगामात शेतकरी संकटात सापडले होते. सुरुवातीला विलंबाच्या पावसाने पेरणी उलटली. त्यानंतर सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली.

In Umarkhed, livestock suffers from lumpy disease | उमरखेडमध्ये लम्पी आजाराने पशुपालक त्रस्त

उमरखेडमध्ये लम्पी आजाराने पशुपालक त्रस्त

ठळक मुद्देजनावरांना बाधा, ठिकठिकाणी लसीकरण, कोरोनाच्या सावटात पशुपालकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक संकटात सापडले आहे. त्यातच पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरावस्था झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहे.
कृषी क्षेत्रावर उपजीविका असलेल्या उमरखेड तालुक्यात अनेक शेतकरी व पशुपालकांकडे पाळीव जनावरे आहे. या जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केले आहे. त्यामुळे जनावरे आजाराच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी व पशुपालक त्रस्त आहे. आधीच खरिप हंगामात शेतकरी संकटात सापडले होते. सुरुवातीला विलंबाच्या पावसाने पेरणी उलटली. त्यानंतर सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने पिकांना फटका बसला. आता जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केल्याने शेतकरी व पशुपालकांसमोर संकट उभे ठाकले आहे.
तालुक्यातील गुरांचे दवाखाने मृतकप्राय दिसून येत आहे. मोबाईल दवाखान्यांचीसुद्धा तीच स्थिती आहे. पशुवैद्यकीय विभागाचा कारभार ढेपाळल्यागत दिसून येत आहे. त्यामुळे जनावरांवर उपचार करणे कठीण झाले आहे. अनेक जनावरांना लम्पीची बाधा झाल्याने जनावरे मृत होण्याची धास्ती पशुपालकांना सतावत आहे. लसीकरणाची मागणी होत आहे.

लम्पी हा जनावरांमधील कोरोना
जनावरांना होणारा लम्पी आजार संसर्गजन्य आहे. कोरोनाप्रमाणेच संसर्गातून जनावरांना हा आजार बळावतो. त्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये तातडीने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

लसीकरणाची गरज
लम्पी आजारामुळे तातडीने जनावरांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात काही ठिकाणी लसीकरण सुरूझाले आहे. मात्र बहुतांश जनावरे लसीकरणापासून अद्यापही दूर आहे. सर्व जनावरांचे तातडीने लसीकरण करावे अशी पशुपालकांची अपेक्षा आहे.

Web Title: In Umarkhed, livestock suffers from lumpy disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.