नादुरुस्त ट्रकवर दुचाकी आदळून दोन तरुण ठार; वणी-यवतमाळ रोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 11:02 IST2022-12-16T10:58:15+5:302022-12-16T11:02:43+5:30
दुचाकीचालक जागीच ठार, तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू

नादुरुस्त ट्रकवर दुचाकी आदळून दोन तरुण ठार; वणी-यवतमाळ रोडवरील घटना
मारेगाव ( वणी) : यवतमाळ रोडवरील करणवाडी समोर नादुरुस्त उभ्या ट्रकवर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात दोघे मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. हरिदास लक्ष्मण टेकाम (२६) व किसन पांडुरंग टेकाम (३१) रा. सालाई पोड (खंडणी) ता. मारेगाव अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन युवकांची नावे आहेत.
ते कामानिमित्त मोटारसायकलने मारेगावकडे येत होते. त्याचवेळी करणवाडी गावाजवळ पलटलेला नादुरुस्त उभा ट्रक न दिसल्यामुळे मोटारसायकल आदळून भीषण अपघात झाला. यात बाइकचालक हरिदास जागीच ठार झाला. गंभीर जखमी किसनला गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने वणीला नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.