दुचाकी बैलबंडीवर धडकली, दोन तरुण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 21:05 IST2020-12-28T21:05:01+5:302020-12-28T21:05:10+5:30
नितेश वामन चांदेकर (२३) व यशपाल लखमा जोडे (१६) दोघेही रा.अर्धवन ता.झरी अशी मृताची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हे दोघेही मुकूटबन येथील काम आटोपून दुचाकीने अर्धवनकडे निघाले होते

दुचाकी बैलबंडीवर धडकली, दोन तरुण ठार
मुकूटबन (यवतमाळ): मुकूटबनवरून अर्धवनकडे निघालेली दुचाकी विरूद्ध दिशेने येणाऱ्या बैलबंडीवर धडकली, त्यात दोनजण ठार झाले आहेत. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मुकूटबन-पाटण मार्गावर मुकूटबनलगत घडली.
नितेश वामन चांदेकर (२३) व यशपाल लखमा जोडे (१६) दोघेही रा.अर्धवन ता.झरी अशी मृताची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हे दोघेही मुकूटबन येथील काम आटोपून दुचाकीने अर्धवनकडे निघाले होते. मुकूटबन शहरालगतच एका बारसमोरून येणाऱ्या बैलबंडीवर त्यांची दुचाकी धडकली. यात नितेश चांदेकर हा जागीच ठार झाला, तर यशपाल जोडे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वणी येथील एका खासगी रूग्णालयात व तेथून ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.