दोन ट्रकच्या अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:48 IST2019-01-20T21:48:09+5:302019-01-20T21:48:44+5:30
उमरखेड रोडवरील एका बारसमोर झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. संदीप पतंगे (२८) असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

दोन ट्रकच्या अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : उमरखेड रोडवरील एका बारसमोर झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
संदीप पतंगे (२८) असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सोमनाथ कदम (२८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एसान गुलाब शेख (२७) आणि प्रशांत वानखेडे (२४) हे दोघे गंभीर जखमी झाले. हे चौघेही एकाच दुचाकीने जात होते. त्यावेळी एका बार समोर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या विचित्र अपघातात संदीप पतंगे जागीच ठार झाला तर सोमनाथ कदम उपचारादरम्यान मृत्यू पावला. जखमींना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.