शेतातील विद्युत तारांचा स्पर्श होऊन दोन अल्पवयीन मुले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 13:37 IST2020-09-10T13:37:00+5:302020-09-10T13:37:20+5:30
शेतात जंगली श्वापदे देऊन शेताची नासाडी होऊ नये म्हणून लावण्यात आलेल्या विजेच्या जिवंत तारेचा स्पर्श होऊन दोन अल्पवयीन मुले ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

शेतातील विद्युत तारांचा स्पर्श होऊन दोन अल्पवयीन मुले ठार
ठळक मुद्देकुटुंबावर कोसळली वीज
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतात जंगली श्वापदे देऊन शेताची नासाडी होऊ नये म्हणून लावण्यात आलेल्या विजेच्या जिवंत तारेचा स्पर्श होऊन दोन अल्पवयीन मुले ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
चांदापूर-वसंतनगर शिवारातील शेतात जिवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने सकाळी १० वाजता सूरज भोपीदास राठोड (१५) आणि विक्की जनार्दन राठोड (१५) दोघेही रा.वसंतनगर हे शेतात गेले असता त्यांना विजेच्या जिवंत तारेचा स्पर्श झाला. ते दोघेही घटनास्थळीच गतप्राण झाले. त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर कुºहाड कोसळली आहे. यवतमाळ ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.