शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

दोन भूमाफिया फिरताहेत मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 9:49 PM

बँकेकडे तारण असतानाही दोन दुकान गाळ्यांची विक्री करून येथील दूध विक्रेत्याची फसवणूक करणारे दोन भूमाफिया पोलिसांच्या आशीर्वादाने सुमारे दीड वर्षांपासून मोकाट फिरत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांचा आशीर्वाद : राजकीय वरदहस्त, अटकपूर्व जामीन नाकारला, बँका-महसूलच्या यंत्रणेची मिलीभगत

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँकेकडे तारण असतानाही दोन दुकान गाळ्यांची विक्री करून येथील दूध विक्रेत्याची फसवणूक करणारे दोन भूमाफिया पोलिसांच्या आशीर्वादाने सुमारे दीड वर्षांपासून मोकाट फिरत आहेत. राजकीय आशीर्वादामुळे पोलीस पाठीशी असल्याने या माफियांनी असे अनेकांना फसवणुकीचे शिकार बनविले आहे.राकेश व मंगेश अशी या भूमाफियांची नावे आहेत. येथील नामांकित दूध विक्रेत्याच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात त्या दोघांविरुद्ध भादंवि ४२०, ४०६, ३४ कलमान्वये २०१६ मध्येच गुन्हा नोंदविला गेला. दूध विक्रेत्याने ठिकठिकाणी तक्रारी दिल्या. मात्र राजकीय अभय असल्याने पोलिसांनी सुरुवातीला या भूमाफियांविरोधात तक्रारी घेणेच टाळले. एका बड्या शिवसेना नेत्याने फोन केल्यानंतर तत्कालीन एसडीपीओंनी तक्रार घेऊन गुन्हा नोंदविला. दरम्यान त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली. तर दुसरीकडे आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड केली. परंतु फसवणुकीचे हे प्रकरण गंभीर असल्याचे नमूद करीत न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही.सदर दूध विक्रेत्याचे प्रकरण असे की, मंगेश नामक भूमाफियाने फेसबुकद्वारे या दूध विक्रेत्याशी मैत्री केली. त्यानंतर महागड्या वाहनांमधून येऊन व बड्या राजकीय नेत्यांशी संपर्क सांगून दूध विक्रेत्याच्या भेटी घेतल्या. लाखो-कोटींच्या बाता करणाºया या मंगेशच्या जाळ्यात अल्पावधीतच दूध विक्रेता अडकला. मंगेशने संदीप टॉकीज परिसरातील दुकान गाळे दाखविले. पाच पैकी दोन दुकाने तातडीने विकायची असल्याचे सांगितले. ही संपत्ती राकेशची असल्याचे सांगितले गेले. राकेश स्वत:ही त्यावेळी उपस्थित होता. कराराची प्रतही दाखविली गेली. तीन लाख पाच हजार रुपयात एक दुकान या भावाने दोन दुकाने दूध विक्रेत्याने खरेदी केली. प्रत्यक्षात त्याचा बाजारभाव तीनपट अधिक असल्याचे सांगितले जाते. दुय्यम निबंधक कार्यालयात सतत अधिकारी-कर्मचाºयांशी सलगी ठेवणाºया प्रकाशने कागदपत्रांची हेराफेरी करताना या व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली. अधिकाºयाच्या कन्सेन्टने किंवा त्यांना अंधारात ठेऊन हा व्यवहार नोंदविला गेला.फेरफारची जबाबदारीही मंगेश व राकेशनेच घेतली होती. सात ते आठ महिने लोटूनही फेरफार होऊ दिला जात नसल्याचे लक्षात आल्याने सदर दूध विक्रेत्याने स्वत: भूमी अभिलेख कार्यालय गाठले असता या दुकान गाळ्यांवर यवतमाळातील एका बँकेचे ५० लाख रुपयांचे कर्ज असल्याची खळबळजनक बाब पुढे आली. विशेष असे सदर बँकेतील लिपिकवर्गीय यंत्रणा व महसूल विभागातील बाबूंच्या संगनमताने हे कर्ज सातबारावर चढविले गेले नाही. मंगेश व राकेशने या दुकानांवर पाच लाखांचे कर्ज होते, ते निल केल्याचा दाखला दूध विक्रेत्याला दाखविला होता. मात्र प्रत्यक्षात पाच लाख परतफेड केल्यानंतर पुन्हा ५० लाख कर्ज उचलले गेले. त्याबाबत दूध विक्रेत्याला अंधारात ठेवण्यात आले.पोलिसांकडे बिनधास्त तक्रारी करास्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीत कुणाचीही फसवणूक झाली असेल तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट पोलिसांकडे अगदी निर्धास्त होऊन तक्रारी कराव्या, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेतून केले.माफिया मंगेश काँग्रेसचा पदाधिकारीभूमाफिया म्हणून ओळखला जाणारा मंगेश हा काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. घटनात्मक पदाच्या आडोश्याने आतापर्यंत त्याने स्वत:चा बचाव केला. शिवाय सत्ताधारी पक्षासोबत थेट मुंबईपर्यंत आपले कॉन्टॅक्ट असल्याने पोलीस आपले काहीच बिघडवू शकत नाही, अशा डरकाळ्या तो व्यापाऱ्यांपुढे फोडतो.सहा लाखांच्या संपत्तीवर ५० लाखांचे कर्ज !सहा लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या दोन दुकान गाळ्यांच्या तारणावर यवतमाळातील शहरी बँकेने तब्बल ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केलेच कसे हा संशोधनाचा विषय आहे. या दुकान गाळ्यांची बाजारभावाने किंमत लावली तरी कर्जाच्या अर्धीही होत नाही. यावरून या कर्जप्रकरणात बँकेतील यंत्रणा गुंतलेली असल्याचे स्पष्ट होते. याच नव्हे तर अशा आणखी काही बँकांची अनेक बोगस कर्ज प्रकरणे यानिमित्ताने पुढे आली आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा