दोन लाखांचे बोगस बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:45 IST2018-05-22T23:45:16+5:302018-05-22T23:45:16+5:30
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे एका घरावर टाकलेल्या धाडीत बीजी-३ या बोगस कपाशी बियाण्यांच्या २९७ बॅग आढळून आल्या. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दोन लाखांचे बोगस बियाणे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : राळेगाव तालुक्यातील खैरी येथे एका घरावर टाकलेल्या धाडीत बीजी-३ या बोगस कपाशी बियाण्यांच्या २९७ बॅग आढळून आल्या. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खैरी येथील प्रमोद भाऊराव डाहुले यांच्या घरी कृषी विभाग आणि वडकी पोलिसांनी मंगळवारी धाड टाकली. त्यावेळी त्यांच्या घरात बीजी-३ बियाण्यांच्या २९७ बॅग आढळून आल्या. या बियाण्यांची किंमत दोन लाख सात हजार ९०० रुपये आहे. या प्रकरणी ठाणेदार दीपक राऊत अधिक तपास करीत आहे. सदर बियाणे कोठून आले, या मागे आणखी कोण-कोण आहे, याचा तपास करीत आहे. सदर बीजी-३ बियाण्यांचे मोठे रॅकेट असून ते लवकरच गजाआड होतील, असे पोलिसांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात गत काही दिवसांपासून बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला असून यवतमाळ जवळ दोन दिवसापूर्वीच बोगस बियाणे पकडण्यात आले होते.