शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जेवण करून परतताना दुचाकीने ठोकरले, दोन मित्रांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

ओम संजय सोळंके (२५, रा. पोहंडूळ) आणि शंतनू दिगंबर माटाळकर (२२, रा. महागाव) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीने रात्री हॉटेलमध्ये जेवण करून गावाकडे परत निघाले होते. त्याच वेळी लातूरवरून तूर घेऊन नागपूरकडे निघालेल्या भरधाव ट्रकने (एमएच-२६बीई-५१९७) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यानंतर दुचाकी ट्रकला अडकून बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेली. यात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे यात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात महागाव-उमरखेड रस्त्यावर मातोश्री शाळेपुढे गुरुवारी रात्री १०.३० वाजता घडला. धडक इतकी भीषण होती की, ट्रकने दुचाकीला एक किमी फरफटत नेले.ओम संजय सोळंके (२५, रा. पोहंडूळ) आणि शंतनू दिगंबर माटाळकर (२२, रा. महागाव) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीने रात्री हॉटेलमध्ये जेवण करून गावाकडे परत निघाले होते. त्याच वेळी लातूरवरून तूर घेऊन नागपूरकडे निघालेल्या भरधाव ट्रकने (एमएच-२६बीई-५१९७) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यानंतर दुचाकी ट्रकला अडकून बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेली. यात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विलास चव्हाण तसेच गावातील नागरिक गणेश भोयर, संतोष जाधव, आकाश पानपट्टे, तेजस नरवाडे, अमोल गावंडेसह पोहंडूळ आणि करंजखेड येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मृतांच्या खिशातील आधार कार्डावरून त्यांची ओळख पटविली. पोलीस बंदोबस्त घटनास्थळी येईपर्यंत संतप्त नागरिकांनी ट्रकची बरीच तोडफोड केली. नंतर ठाणेदारांनी ट्रक सुरक्षित स्थळी हलविला.   संबंधित ट्रकचालक विश्वंभर डोंबरे हा अपघातानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.  पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अपघातातील एका मृतावर शुक्रवारी सकाळी पोहंडूळ येथे तर दुसऱ्यावर करंजखेड येथे अंत्यसंस्कार झाले. 

 चावीविना गाडी सुरु करुन गेला होता जेवायला- घटनेच्या दिवशी शंतनू आणि ओम या दोघांनीही महागाव येथे जाऊन हॉटेलमध्ये जेवणाचा बेत आखला होता. मात्र रात्रीच्या वेळी दुचाकीने जाऊ नको म्हणून घरातील मंडळींनी ओमला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याला दुचाकीची चावीही दिली नाही. परंतु मित्रासोबत बाहेर जाऊन जेवणाचा हट्ट भागविण्यासाठी ओमने चक्क चावीविनाच दुचाकी सुरू केली आणि महागावपर्यंत आला. तेथून दोन्ही मित्र उमरखेड रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. तेथून परत येताना ट्रकच्या रूपात आलेल्या मृत्यूने त्यांचाच घास घेतला.

कुटुंबांचा आधारच गेला- या घटनेतील एक मृतक शंतनू माटाळकर हा महागाव येथे एका खासगी लॅबमध्ये काम करीत होता. त्याला आई-वडील नाही. त्याच्या मागे दोन विवाहित बहिणी आहेत. त्याच्या कुटुंबातील तो एकमेव कर्ता होता. तर दुसरा मृतक ओम सोळंके हा कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये खासगी काम करीत होता. पोहंडूळ येथे त्याचे आई-वडील, भाऊ व लहान बहीण राहते. घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे दोन दिवसापूर्वीच तो पोहंडूळ येथे आला होता. मात्र गुरुवारी रात्री अपघाताने दोन कुटुंबांचे आधार असलेले हे जीव हिरावले. 

 

टॅग्स :Accidentअपघात