यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 32 नव्याने पॉझिटिव्ह, 43 कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 18:23 IST2020-12-11T18:23:30+5:302020-12-11T18:23:37+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 390 रिपोर्ट प्राप्त झाले.

Two coronary heart disease patients die in Yavatmal district 32 newly positive, 43 coronal free | यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 32 नव्याने पॉझिटिव्ह, 43 कोरोनामुक्त

यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 32 नव्याने पॉझिटिव्ह, 43 कोरोनामुक्त

यवतमाळ : जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 52 वर्षीय पुरुष आणि 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 32 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 43 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 390 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 32 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 358 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 280 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11880 झाली आहे. 24 तासात 43 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11221 आहे. तर जिल्ह्यात एकूण 379 मृत्युची नोंद आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत 116304 नमुने पाठविले असून यापैकी 115701 प्राप्त तर 603 अप्राप्त आहेत. तसेच 103821 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: Two coronary heart disease patients die in Yavatmal district 32 newly positive, 43 coronal free