शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केराम हत्याकांडातील दाेघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 22:28 IST

प्रफुल गजबे, हर्षल चचाणे रा. माळीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे दाेघेही अनेक दिवसांपासून पाेलिसांना चकमा देत हाेते. त्याचे लाेकेशन काढून हर्षल चचाणे याला अमरावती येथून ताब्यात घेतले. तर प्रफुल गजबे याला यवतमाळात अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील पाच आराेपीपैकी तिघांना पाेलिसांनी १२ तासात अटक केली. मात्र यातील दाेघे पसार झाले, त्यांचा शाेध सुरू हाेता. या आराेपींनी साेमवारी महिनाभरानंतर पाेलिसांनी अटक केली. प्रफुल गजबे, हर्षल चचाणे रा. माळीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे दाेघेही अनेक दिवसांपासून पाेलिसांना चकमा देत हाेते. त्याचे लाेकेशन काढून हर्षल चचाणे याला अमरावती येथून ताब्यात घेतले. तर प्रफुल गजबे याला यवतमाळात अटक केली. या आराेपींचा  प्रवीण कवडुजी केराम रा. तलावफैल याच्यासाेबत वाद झाला हाेता. प्रवीण हा अक्षय राठाेड टाेळीचा सक्रिय सदस्य हाेता. त्याच्यावर करण पराेपटे याच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे. प्रवीण आपला गेम करेल या भीतीतून त्याची संगनमताने हत्या करण्यात आली. ६ ऑक्टाेबरच्या रात्री त्याच्यावर दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन आराेपी साहिल संजय रामटेके, वेदांत मानकर, निखिल उर्फ पीजी, प्रफल गजबे, हर्षल चचाणे यांनी हल्ला केला. यातील तिघांना तत्काळ अटक केली. पसार असलेल्या गजबे व चचाणे याला साेमवारी अटक केली. ही कारवाई शहर पाेलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक जनार्धन खंडेराव, रवी नेवारे, अंकुश फेंडर, सुनील पैठणे यांनी   केली.

जाब विचारणाऱ्याला  केले जखमी - यवतमाळ : मुलाला मारहाण का करता असा जाब विचारणाऱ्या महिलेला आरोपींनी मारहाण केली. ही घटना उमरखेड शहरातील चोखामेळा वाॅर्डात घडली. प्रयागबाई विकास लांबटिळे यांच्या तक्रारीवरून आरोपी सोनू उर्फ मुन्ना लहू सोनटक्के विरोधात उमरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. शहरात गांजाची सहज उपलब्धता होत आहे. नशेच्या आहारी गेलेल्यांकडून शरीर दुखापतीचे गुन्हे केले जात आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस