सागवान तस्करी दडपण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: March 24, 2015 23:58 IST2015-03-24T23:58:03+5:302015-03-24T23:58:03+5:30

तालुक्यातील वाकी जंगलात आढळलेले बेवारस सागवान महसूल विभागाच्या जागेतील दाखवून तस्करी दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Trying to suppress the smuggling | सागवान तस्करी दडपण्याचा प्रयत्न

सागवान तस्करी दडपण्याचा प्रयत्न

यवतमाळ : तालुक्यातील वाकी जंगलात आढळलेले बेवारस सागवान महसूल विभागाच्या जागेतील दाखवून तस्करी दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सोमवारी मध्यरात्री संपूर्ण सागवान जोडमोहा डेपोमध्ये तातडीने जमा करण्यात आले.
वाकी येथे सापडलेल्या बेवारस सागवानामध्ये दोन लाकडांची मोठी गोलाई आहे. एका ट्रॅक्टरमध्ये दोनच आेंडके आणण्यात आले. यावर कुपकटाई करतांना मारतात तसा पट्टा आहे. या सर्व लाकडांवर २०५, २०७ आणि तिसरा अस्पष्ट असा हॅमर आहे. वाकी गावालगत जंगलात जाणाऱ्या रस्त्यावर हा माल पडून होता. तब्बल पंधरा दिवसापासून बेवारस सागवान पडून असताना सुध्दा स्थानिक अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात कशी आली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नियमाप्रमाणे सागवान लाकडाची वाहतूक ही दिवसाच करणे अपेक्षित असताना रात्री जंगल परिसरातून लाकडे जोडमोहा डेपोत तातडीने आणण्यात आली. त्यासाठी डेपोतील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याने विशेष सूचना दिल्या. या बेवारस मालासंदर्भात सुरूवातीला पांढरकवडा आणि यवतमाळ वन विभागाच्या हद्दीवरून वाद सुरू होता. त्यानंतर यवतमाळच्या अधिकाऱ्यांनी हा माल ताब्यात घेतला. नेमके काय गौडबंगाल आहे याची चर्चा रंगत आहे. यापूर्वी सुध्दा यवतमाळ वन विभागातील झुली चौकी येथूल गेलेला ट्रक उमरी जवळ पकडण्यात आला. यात परवानगी पेक्षा अधिक सागावन आढळून आले. त्यानंतर चिचघाट येथील महसूलच्या कटाईचे प्रकरण पुढे आले. आता पून्हा बेवारस सागवानाचे प्रकरण बाहेर आले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Trying to suppress the smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.