शिदोरीत विष टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: November 4, 2014 22:46 IST2014-11-04T22:46:56+5:302014-11-04T22:46:56+5:30
जुन्या वैमनस्यातून शिदोरीत विष टाकून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना तालुक्यातील वाळकी येथे घडली. प्रकरणी मंगळवारी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन

शिदोरीत विष टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न
जुने वैमनस्य : वाळकीच्या घटनेने खळबळ
नेर : जुन्या वैमनस्यातून शिदोरीत विष टाकून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना तालुक्यातील वाळकी येथे घडली. प्रकरणी मंगळवारी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंद हेलांडे (३८) रा.वाळकी असे विष प्रयोग झालेल्या युवकाचे नाव आहे.
१५ सप्टेंबर रोजी गोविंद हा शेतात फवारणीसाठी गेला होता. सोबत नेलेली शिदोरी त्याने झाडाला बांधून ठेवली. या संधीचा फायदा घेत किसन वनवे, तुळसाबाई वनवे, महेंद्र वनवे सर्व रा.वाळकी यांनी शिदोरीत विष टाकले. शिदोरीतील पदार्थ सेवन करताच गोविंदची प्रकृती बिघडली. त्याला तत्काळ उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले. प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याला मंगळवारी सुटी झाली. लगेच त्याने नेर पोलिसात तक्रार दाखल केली. यानुसार वनवे कुटुंबातील तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
गोविंदवर विष प्रयोग झाल्याची तक्रार त्याचा भाऊ हरिभाऊ पुरुषोत्तम हेलांडे याने यापूर्वीही करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रत्येकवेळी टोलवून लावले. अखेर गोविंदच्या उपस्थितीत हरिभाऊने दिलेली तक्रार पोलिसांनी स्वीकारून गुन्हा नोंदविला. (तालुका प्रतिनिधी)