शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

जांब बायपासवर ट्रकची समोरासमोर भीषण धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

चंद्रभान गोविंदप्रसाद विश्वकर्मा (३५) रा. उदयपूर ता. बचैया जि. कटनी मध्यप्रदेश असे मृत चालकाचे नाव आहे. तर सुनील आदित्यसिंग ठाकूर (३८) रा.श्रीरामपूर जि. अहमदनगर हा गंभीर जखमी आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ शहरातूनच जातो. बायपासवर या मार्गाचे रुंदीकरण झाले आहे. चौपदरीकरणानंतर येथे अपघात कमी होण्याऐवजी वाढले आहे.

ठळक मुद्देएक जागीच ठार, दुसरा गंभीर : सात तासात दुसरा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरालगतच्या जांब बायपासवर शनिवारी अपघाताची मालिकाच पहायला मिळाली. सायंकाळी क्रिकेट खेडाळूंचे वाहन पुलाच्या संरक्षण भिंतीवर धडकून दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा काही तासाने रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. यात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.चंद्रभान गोविंदप्रसाद विश्वकर्मा (३५) रा. उदयपूर ता. बचैया जि. कटनी मध्यप्रदेश असे मृत चालकाचे नाव आहे. तर सुनील आदित्यसिंग ठाकूर (३८) रा.श्रीरामपूर जि. अहमदनगर हा गंभीर जखमी आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ शहरातूनच जातो. बायपासवर या मार्गाचे रुंदीकरण झाले आहे. चौपदरीकरणानंतर येथे अपघात कमी होण्याऐवजी वाढले आहे.सुसाट वेगाने वाहने जातात. विशेष करून वनवासी मारोती येथे चौफुली आहे, जांब गावाकडे जाण्यासाठी चौफुली आहे. गोदनी येथे चौफुली आहे, त्यानंतर चापडोह पुनर्वसन येथे घाटंजीला जाण्यासाठीचा मार्ग असल्याने चौफुली आहे. या ठिकाणी वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे बरेचदा विरुद्ध दिशेने वाहन चालविले जाते. यातूनच अपघात घडत आहे. डायव्हरशन व्यवस्थित दिसत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जाते. शनिवारी रात्री कोळसा घेऊन जात असलेला ट्रक (एमएच-४२-बी-७७३२) चुकीच्या दिशेने येत होता, त्याने समोरुन येणाऱ्या टँकरला (क्र.एमएच-३१-सीक्यू-३७१४) जोरदार धडक दिली. यात कोळसा ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. एलिमेंट मॉलसमोर हा अपघात घडला. कोळसा घेऊन हा ट्रक नांदेडकडे जात होता.

टॅग्स :Accidentअपघात