नागपूर तुळजापूर महामार्गावर ट्रकचा अपघात, चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 13:14 IST2021-09-20T13:10:37+5:302021-09-20T13:14:27+5:30
छत्तीसगडवरुन वसमतला केळी आणण्यासाठी जात असलेल्या ट्रकचा दत्तरामपुरजवळ अपघात झाला. वेग जास्त असल्यामुळे ट्रकमधील कॅरेट झाडांवर, घरावर जावून पडले. यात चालक जखमी झाला असल्याची माहिती आहे.

नागपूर तुळजापूर महामार्गावर ट्रकचा अपघात, चालक जखमी
यवतमाळ : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील दत्तरामपुरजवळ आज सकाळी ५ वाजता ट्रकला अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.
नागपूर-तुळजापूर महामार्गावरील रस्त्याचे अपूर्ण काम वाहनांच्या अपघातासाठी जवाबदार ठरत आहे. दत्तरामपुरजवळ महामार्गावरील काम अर्धवट असल्याने रस्ता अरुंद आहे, परिणामी नेहमीच अपघात होतात. सादर ट्रक हा छत्तीसगडवरुन वसमतला केळी आणण्यासाठी जात होता जात होता. दरम्यान, वेग जास्त असल्यामुळे ट्रकमधील कॅरेट झाडांवर,घरावर जावून पडले. यात चालक जखमी झाला असल्याची माहिती आहे.
या महामार्गाच्या बांधकामाचे कार्य सध्या सुरु आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहतुकीची कोंडी व अरुंद रस्ते यांना तोंड द्यावे लागते. अशातच वेगाने आलेल्या ट्रकचा तोल जाऊन अपघात घडल्याचे सांगण्यात येते.