पारवा ठाणेदारासह तिघांचे बयान नोंदविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:06+5:30

३५ लाखांच्या फसवणुकीआड एक कोटींची वसुली, बनावट नोटा, नोटा दुप्पट करणे व दोन ते २० लाखात दहावी-बारावीसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाच्या बोगस पदव्या मिळवून देणाºया रॅकेटचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला. त्याची दखल घेत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी आपले वाचक उपअधीक्षक गिरीष बोबडे यांच्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली.

The trio's statement was recorded with Parva Thanedar | पारवा ठाणेदारासह तिघांचे बयान नोंदविले

पारवा ठाणेदारासह तिघांचे बयान नोंदविले

Next
ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षकांचे चौकशी पथक : बनावट नोटा, बोगस पदव्यांचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बनावट चलनी नोटांच्या प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या गोपालकृष्ण उर्फ संजय साबने (रा. बेळगाव, कर्नाटक) याला थातूरमातूर चौकशी करून सोडून देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधर (विद्यमान पारवा ठाणेदार) यांच्यासह तिघांची बयाने नोंदविण्यात आली.
३५ लाखांच्या फसवणुकीआड एक कोटींची वसुली, बनावट नोटा, नोटा दुप्पट करणे व दोन ते २० लाखात दहावी-बारावीसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाच्या बोगस पदव्या मिळवून देणाऱ्या रॅकेटचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला. त्याची दखल घेत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी आपले वाचक उपअधीक्षक गिरीष बोबडे यांच्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. तीन दिवसांपासून बोबडे यांच्या नेतृत्वातील हे चौकशी पथक यवतमाळात मुक्कामी आहे. या पथकाने अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक तथा विद्यमान पारवा ठाणेदार गोरख चौधर व त्यांच्या अधिनस्त जमादार सुरेश मेश्राम, शिपाई विजय नागरे या तिघांची बयाने नोंदविली. याशिवाय जेसीबी व पोकलॅन्ड खरेदीत ३५ लाखांनी फसवणूक झाल्याचा दावा करणारे कथित सीए हरीश चव्हाण यांचीही चौकशी केली जाणार आहे. सीएची ही फसवणूक बनावट नोटा मिळविणे, नोटा दुप्पट करून घेणे अशा प्रकारातून झाली काय ? याचाही छडा लावला जाणार आहे. सीए चव्हाण बोगस पदव्या विकण्याच्या गोरखधंद्यातही सक्रिय आहे. त्यांनी आतापर्यंत कुणाला किती पदव्या विकल्या यावरही चौकशीचा प्रकाशझोत राहणार आहे. अमरावती, नागपुरात या कथित सीएचा कुठे क्राईम रेकॉर्ड मिळतो का, त्यांचे नागपुरातील कार्यालय काही वर्षापूर्वी फोडण्यामागील नेमके कारण काय हेसुद्धा तपासले जाणार आहे. सीए चव्हाण यांचे मुंबई परिसरातही कार्यालय असून तेथून नेमके कोणते काम चालते याची चौकशी केली जाणार आहे.

‘तो’ राजकीय कार्यकर्ताही निशाण्यावर
या सीएमार्फत दहावी-बारावीची सीबीएसईची गुणपत्रिका व प्रमाणपत्र दोन लाख रुपये देऊन मिळविणाºया पांढरकवडा येथील एका राजकीय कार्यकर्त्याचीसुद्धा चौकशी महानिरीक्षकांच्या पथकामार्फत केली जाणार आहे. हा कार्यकर्ता केवळ नववी पास आहे. त्याला दहा लाखात बीई सिव्हीलची पदवी मिळवून देण्याची आॅफर कथित सीए चव्हाणने दिली होती. विशेष असे या राजकीय कार्यकर्त्याने २०१९ ला वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारीही चालविली होती. अलिकडे हा राजकीय कार्यकर्ता अवैध रेती तस्करीत सक्रिय आहे. त्याचे आर्थिक सोर्स शोधण्याचे आव्हानही महानिरीक्षकांच्या पथकापुढे आहे. या कार्यकर्त्याचे महागाव आणि वर्धा जिल्ह्यात क्राईम रेकॉर्ड शोधण्याचे प्रयत्न पथकाकडून केले जाणार आहे. आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या गोपालकृष्ण याला सोडून देण्याच्या मोबदल्यात वसूल केलेल्या एक कोटीत पोलीस दलातील नेमके वाटेकरी कोण, याचा छडा महानिरीक्षकांचे पथक लावणार का याकडे नजरा आहे.

संशयास्पद नोटरीच्या वकिलाकडेही पथक धडकले
म्होरक्या गोपालकृष्ण साबने याला ३१ मे २०१९ ला बेळगावातून ताब्यात घेण्यात आले होते. परंतु त्याच्या दोन आठवड्यापूर्वीच कथित सीए चव्हाण व आरोपी यांच्यात समेट झाल्याचे नोटरीवर दाखविले गेले. आरोपी व चव्हाण यांच्या कोऱ्या कागदावर एपीआय चौधर यांनी सह्या घेऊन ही नोटरी घडवून आणली होती. जुन्या तारखेत दोन्ही पक्ष समक्ष हजर नसताना नोटरी करणारे ते वकील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या वकिलाकडेही महानिरीक्षकांच्या चौकशी पथकाचे प्रमुख पोलीस उपअधीक्षक गिरीष बोबडे यांनी मंगळवारी धडक दिली. दोन आठवड्याआधीच नोटरी होऊन सेटलमेंट झाली असेल तर आरोपीच्या अटकेची गरज काय, असा मुद्दा उपस्थित केला गेला. या चौकशीत बोगस नोटरी करणारे वकीलही गोत्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे चौकशी पथक या प्रकरणात आणखी कुणाकुणाकडे धडक देते याकडे नजरा लागल्या आहे.

Web Title: The trio's statement was recorded with Parva Thanedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.