शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोवीड -१९ चा उपचार जन आरोग्य योजनेतून शिधापत्रिकेची अट शिथिल झाल्याने लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

सुरेंद्र राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क कारोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शासकीय रुग्णालया मोफत उपचार ...

ठळक मुद्देजन आरोग्य योजनेत कोणते महत्वपूर्ण बदल झालेत ?

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्ककारोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शासकीय रुग्णालया मोफत उपचार केला जात आहे. या योजनेच्या कक्षा रुंदावल्या असून केसरी शिधा पत्रिकाधारका प्रमाणेच श्वेत शिधा पत्रिकाधारकांना कोरोना सह विविध आजावर मोफत उपचार मिळत आहे. यावतमाळ जिल्ह्यात २० खासगी रुग्णालये अंगीकृत केलेली असल्याचे जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र इरपनवार यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधतानासांगितले ...महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणत्या आजारांवर उपचार ?या योजनेमध्ये कोवीड -१९ सह १२० आजारावर उपचार केले जातात. केवळ कोरोना चा अपवाद सोडला तर आता इतर आजारांवर खासगी रुग्णालयात उपचार करता येतात. यामध्ये प्रामुख्याने गर्भ पिशवीचे आजार, हर्निया, प्रसूती व सिझेरिअन यासारखे ६७ आजार आहेत. ३१ जुलै २०२० पर्यंत आणखी आजाराच्या उपचाराचा योजनेत समावेश केला जाणार आहे. आता सध्या एकूण ९९६ आजारावर या योजनेतून मोफत उपचार करण्यात येत आहे.जन आरोग्य योजनेअंतर्गत किती रुग्णालये अंगीकृत आहेत?यवतमाळ जिल्ह्यात एकूण २० रुग्णालयात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळतो.यात १४ खासगी व ६ शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे.जन आरोग्य योजनेत कोणते महत्वपूर्ण बदल झालेत ?यापूर्वी योजनेचा लाभ फक्त केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रीका धारकांना मिळत होता. आता पांढरे शिधा पत्रीकाधारक सुध्दा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एखाद्याकडे शिधा पत्रीका नसेल तर तहसीलदारांच्या पत्रानुसार त्या रुग्णाला योजनेचा लाभ घेऊा येऊ शकतो. यामुळे रूग्णांची लाभार्थी संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णासोबतच शहरी रुग्णही योजनेचा मोठ्याप्रमाणात लाभ घेत आहेत.अडचण असल्यास मदत तत्परजन आरोग्य योजनेचा लाभ घेणार रुग्ण हा अतिशय सामान्य घटक असल्याने त्याची प्रक्रिया अतिशय सुटसुटीत केली आहे. एखाद्या रुग्णाला अडचण असल्यास तो आरोग्य मित्राशी संपर्क करून आपली अडचण सोडवू शकतो. येथेही त्याचे समाधान झाले नाही तर टोल फ्री क्रमांक १५५३८८ आणि १८००२३३२२०० यावर संपर्क करून थेट वरिष्ठांकडून योजनेच्या लाभाबाबत मार्गदर्शन घेऊ शकतो. त्याच्या अडचणीची पुर्तता करण्यास मदत होते. जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून खुद्द जिल्हाधिकारी याजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य