शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

व्यापारी, भाजपचा लाॅकडाऊनला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 5:00 AM

यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. दुपारी स्थानिक बसस्थानक चौकातून व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. तहसील चौक, गांधी चौक, लोखंडी पूल ते पाच कंदील चौकमार्गे जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्य शासनाविरोधात नारेबाजी केली. त्यानंतर चेंबर ऑफ काॅमर्स अन्ड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देयवतमाळातील रस्त्यांवर उतरुन निदर्शने : चेंबर ऑफ काॅमर्सचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत तब्बल २५ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवेची ३० ते ४० टक्के दुकाने खुली राहत असताना लाॅकडाऊनचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करीत बुधवारी यवतमाळात व्यापारी रस्त्यावर उतरले. यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. दुपारी स्थानिक बसस्थानक चौकातून व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. तहसील चौक, गांधी चौक, लोखंडी पूल ते पाच कंदील चौकमार्गे जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्य शासनाविरोधात नारेबाजी केली. त्यानंतर चेंबर ऑफ काॅमर्स अन्ड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान बुधवारी भाजपच्या आमदारांनीही लाॅकडाऊनला तीव्र विरोध करीत सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एकीकडे व्यापारपेठ बंद तर दुसरीकडे ई-काॅमर्स सुविधा सुरू ठेवून सरकार व्यापाऱ्यांना आणखी अडचणीत आणत असल्याचा आरोप करण्यात आला. जमावबंदी आदेश असला तरी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत नागरिकांचा शहरात मुक्त संचार राहतो. मग व्यापाऱ्यांवरच अन्याय का असा प्रश्न विचारण्यात आला आहे.  व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेण्यासाठी सरकार व प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून त्यानंतर कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.  आंदोलनात मंडप, कॅटरिंग असोसिएशन, नेताजी चौक कापड व्यापारी, इंदिरा गांधी मार्केट व्यापारी, हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, बुक डेपो असोसिएशनसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, मोर्चा काढून जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.  

कुणाचे भाडे तर कुणाचे वीज बिल झाले थकीत  जिल्ह्यात छोट्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. या दुकानावर काम करणाऱ्या  कामगारांची संख्या मोठी आहे. पुढील २५ दिवस व्यापार बंद राहिल्यास कामगार आणि दुकानदारांवर उपासमार ओढवणार आहे.  पाहिजे तर दुकानाच्या वेळा कमी कराव्यात.  गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची आर्थिक स्थिती आधीच बिघडली आहे. अनेकांना दुकानाचे भाडेही देता आले नाही. तर, काहींचे विजेचे बिल थकलेले आहे. आता पुन्हा दुकाने बंद केल्याने  जगायचे कसे, असा प्रश्न व्यावसायिक आणि कामगारांनी उपस्थित केला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या