प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाळकरी मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 15:54 IST2021-01-20T15:52:15+5:302021-01-20T15:54:47+5:30
Yawatmal news १० वीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली व नंतर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाळकरी मुलीवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : १० वीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली व नंतर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तालुक्यातील गोंडबुरांडा येथील १०वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरची परिस्थिती हलाखीची असतानाही, तिच्या पालकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल विकत घेऊन दिला. दरम्यान, पीडित विद्यार्थिनीची फेसबुकच्या माध्यमातून रोहपट येथील एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.
२४ डिसेंबर, २०२० रोजी आरोपीने गोंडबुरांडा येथे येऊन तिच्या आजोबाच्या शेतात तिला बोलविले व तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर, १८ जानेवारीला सोमवारी पुन्हा आरोपीने पीडितेला मोटारसायकलवर गावाबाहेर घेऊन गेला व तेथेही तिच्यावर अत्याचार केला. रात्री उशिरा तिला घरी सोडून दिले. कुटुंबीयांनी मुलीला शाळेतून रात्री उशिरा येण्याचे कारण विचारले असता, पीडितेने आपबिती कथन केली. प्रकरणी बुधवारी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीस पोलिसांनी पोक्सोअंतर्गत विविध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जगदिश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, जमादार मनोज बडोलकर करीत आहेत.