शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात तीन ठार, महिलांसह २१ जखमी

By admin | Updated: October 13, 2016 00:36 IST

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर महिलांसह २१ जण जखमी झाले. दुर्गा विसर्जन करून परतणाऱ्या भाविकांच्या अ‍ॅपे आॅटोरिक्षाला...

सायखेडाजवळ दुचाकी अपघात : भोसाजवळ आॅटोरिक्षाला इंडिकाची धडकलोणबेहळ/रुंझा: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर महिलांसह २१ जण जखमी झाले. दुर्गा विसर्जन करून परतणाऱ्या भाविकांच्या अ‍ॅपे आॅटोरिक्षाला इंडिका कारने माहूर मार्गावरील भोसा गावाजवळ धडक दिल्याने एक महिला ठार तर दोन्ही वाहनातील महिलांसह २१ भाविक जखमी झाले. तर यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील सायखेडा (धरण) फाट्यावर दोन दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील जय महाकाली दुर्गोत्सव मंडळाचे बुधवारी दुर्गा विसर्जन होते. त्यासाठी गावातील भाविक ट्रॅक्टर आणि अ‍ॅपे आॅटोरिक्षाने धनोडा येथील पैनगंगेवर गेले होते. परतीच्या प्रवासात भोसा गावाजवळ दुपारी ४ वाजता अ‍ॅपे आॅटोरिक्षाला समोरून येणाऱ्या इंडिकाने जबर धडक दिली. त्यामुळे भाविकांनी खचाखच भरलेला अ‍ॅपे आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यात मीरा नामदेव पिंपळे (६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अ‍ॅपे आॅटोरिक्षातील ज्योती संतोष हिरुळकर (३५), माधव सुभाष पिंपळे (२५), पार्वती मारोती कुमरे (४५), सरस्वती अंबादास देठे (६०), रामेश्वर देविदास ढगे (३०), केवल दीपक जयस्वाल (२०), विश्वनाथ सोनबा पिंपळे (६०), वाघाबाई मारोती तिळे (६०), संतोष शंकर दबडगाव (४०), दादाराव नत्थु ढगे (४०), शोभा सुभाष पिंपळे (४०), जलपथ लक्ष्मण तोडसाम (२१), सुंदरबाई विश्वनाथ पिंपळे (६०), आकाश गणपत निचत (१८), वृषभ सुभाष केशरवानी (३१), पंचफुला आनंदा हातमोडे (६०) सर्व रा. लोणबेहळ, ता. आर्णी तर इंडिका कारमधील राखी सुरेश कल्याण (२७), रिना सुरेश कल्याण (२५), पिंकी (२०) सर्व रा. नागपूर, संजय प्रताप गोंधळे (२६), माधुरी प्रताप गोंधळे (२६) दोघे रा. यवतमाळ असे जखमींची नावे आहेत. अपघातात अनेकांच्या हाता-पायाला जबर मार लागला असून, जखमींना तात्काळ लोणबेहळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी सर्व जखमींना एका ट्रॅक्टरव्दारे रुग्णालयात दाखल केले. तर यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील सायखेडा (धरण) गावाजवळ बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्या. त्यात प्रफुल्ल मनोहर शेंडे (२५) रा.डोंगरखर्डा ता.कळंब आणि गुलशन यशवंत घोडाम (२५) रा.पाथरी ता.पांढरकवडा ठार झाले. तर संतोष कवडू तोडसाम (२८) रा.सायखेडा नवाटी ता.यवतमाळ आणि अनिल मडावी (२५) रा.दिग्रस अशी जखमींची नावे आहे.जखमींना उमरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना पांढरकवडाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरमे, जमादार होमदेव किनाके यांनी रुग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)