वणी येथे अपघातात तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:34 IST2018-06-24T22:32:59+5:302018-06-24T22:34:35+5:30
वणी ते घुग्गूस मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ-ट्रकचा अपघात झाला. यात तीन जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.१० वाजताच्या सुमारास घडली.

वणी येथे अपघातात तीन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी ते घुग्गूस मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ-ट्रकचा अपघात झाला. यात तीन जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.१० वाजताच्या सुमारास घडली.
प्रमिला रामकृष्ण आस्वले (४०), शशीकला पंढरीनाथ कुबडे (४८) व चालक प्रशांत देवराव खाडे (२५) सर्व रा.जैन ले-आऊट वणी अशी मृतांची नावे आहेत. मंगला अंबादास शेळकी (३८), अंकुश बदखल (२४), प्रतिभा राजू बोढे (३४), कमलाबाई शेळकी (५५), सूमन बापूजी बोढे (६५) सर्व रा.जैन ले-आऊट वणी, अशी गंभीर जखमींची नावे आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर करण्यात आले. स्कॉर्पिओ क्रमांक एम.एच.२९-ए.आर.१४३८ ने जैन ले-आऊटमधील वऱ्हाडी वणीतील महाविर भवनात आयोजित लग्नसोहळ्याकरिता जात होते. यातील एका वऱ्हाड्याचे काही साहित्य घरी राहिल्यामुळे स्कॉर्पिओ पुन्हा जैन-लेआऊटकडे जाण्यासाठी वळली. मात्र ही गाडी डिव्हायडरवर आदळल्याने त्यातील दोन महिला खाली कोसळल्या. याचवेळी अचानक मागून येणाऱ्या ट्रकने या दोन्हीही महिलांना चिरडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या ट्रकची स्कॉर्पिओला धडक बसल्याने त्यामधील चालकाहीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच टोल नाक्यावरील एका रूग्णवाहिकेद्वारे या सर्व जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी ट्रकचालक राजेंद्र मारोती नक्षीणे रा.नरसाळा (ता.मारेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.