शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पुसद येथील नाईक घराण्याची तिसरी पिढी पोहोचली बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 5:00 AM

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्यासह आमदार इंद्रनिल नाईक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधाकडे धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून व शेतकऱ्यांना धीर दिला. जुन्या काळात उमरखेड व महागाव हे दोन्ही तालुके पुसद तालुक्यात येत होते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांची पुसदच्या नाईक बंगल्याशी घट्ट नाळ जुळलेली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्रीव्दय दिवंगत वसंतराव नाईक व दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे अनेक कार्यकर्ते तालुक्यात होते.

ठळक मुद्देउमरखेड तालुक्यामध्ये नुकसानीची पाहणी क स्थानिक लोकप्रतिनिधींना आत्मचिंतनाची गरज

 अविनाश खंदारेलोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना प्रचंड फटका बसला. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. संकटातील शेतकऱ्यांना धीर देण्याच्या उद्देशाने पुसद येथील नाईक घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी व पुसदचे आमदार इंद्रनिल नाईक थेड तालुक्यातील बांधावर पोहोचले. त्यांनी संकटातील शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्यासह आमदार इंद्रनिल नाईक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधाकडे धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून व शेतकऱ्यांना धीर दिला. जुन्या काळात उमरखेड व महागाव हे दोन्ही तालुके पुसद तालुक्यात येत होते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांची पुसदच्या नाईक बंगल्याशी घट्ट नाळ जुळलेली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्रीव्दय दिवंगत वसंतराव नाईक व दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे अनेक कार्यकर्ते तालुक्यात होते. त्यानंतर माजीमंत्री मनोहरराव नाईक यांनीही परिसरात दांडगा संपर्क कायम ठेवला.आता तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले आमदार इंद्रनिल नाईक यांनीही पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकत नाईक घराण्याची परंपरा जोपासली. नाईक बंगला तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या सुखदुखात सहभागी होत असल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याची लाट उसळली आहे. तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात आमदार नामदेव ससाणे, तर भाजपचेच माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्यात अलिकडे बेबनाव झाल्याने भाजपात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. या नेत्यांची सामान्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.काँग्रेसमध्ये दुही वाढली, ह्यएकला चलो रेह्णची भूमिकाजिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती काँग्रेसचे राम देवसरकर, काँग्रेसचेच पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे, असे दोन शिलेदार असताना या पक्षातही मरगळ निर्माण झाली आहे. नेतेमंडळी ह्यएकला चलो रेह्णच्या भूमिकेत वावरत असून दोन्ही सभापती आपापल्या कार्यकर्त्यांचा लवाजमा ठेवून आहे. काँग्रेसमध्ये दुही वाढली असून पक्ष वाढीसाठी कुणालाही सवड नाही. यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनिल नाईक यांनी मात्र जनसंपर्क वाढवत तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. मात्र ऐनवेळी ते दुखात सहभागी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस