वाहन चोरट्यांची टोळी नेर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:14+5:30

रमेश ऊर्फ राजू रमाकांत तिवारी (मध्यप्रदेश), मो. इशाक शेख बहादूर, मो. राजिक मो. इशाक (मूर्तिजापूर) अशी या चोरट्यांची नावे आहे. तालुक्याच्या पिंपरी शिवारातून एमएच २९ - बीसी ६४८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर चोरल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Thieves of Vehicle in Ner police custody | वाहन चोरट्यांची टोळी नेर पोलिसांच्या ताब्यात

वाहन चोरट्यांची टोळी नेर पोलिसांच्या ताब्यात

ठळक मुद्देतीन दिवसांची कोठडी : चोरलेल्या वाहनांची परराज्यात विल्हेवाट

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : चोरीच्या वाहनांची परराज्यात विल्हेवाट लावणाऱ्या तिघांना नेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील एका चोरीची कबुली या चोरट्यांनी दिली. दरम्यान न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रमेश ऊर्फ राजू रमाकांत तिवारी (मध्यप्रदेश), मो. इशाक शेख बहादूर, मो. राजिक मो. इशाक (मूर्तिजापूर) अशी या चोरट्यांची नावे आहे. तालुक्याच्या पिंपरी शिवारातून एमएच २९ - बीसी ६४८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर चोरल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा ट्रॅक्टर नेर येथील बाबाराव रामदास शिंगाडे यांच्या मालकीचा आहे.
शेगाव पोलिसांनी या तिघांना वाहन चोरीच्या आरोपात अटक केली होती. सखोल चौकशीअंती त्यांची बुलडाणा व नांदेड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. शनिवारी रात्री या तिघांनाही नेरचे ठाणेदार पितांबर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारागृहातून ताब्यात घेतले. पुढील तपास एसपी एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, ठाणेदार पितांबर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद निराळे, धीरज राऊत, रोशन गुर्जर, राजू कुकडे, मोहन कसबे, कासम निरपूरकरवाले, नितीन कडूकार करीत आहे.

Web Title: Thieves of Vehicle in Ner police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.