शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत कचरा उचलायला यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:48 IST

आर्णी : ५० हजार लोकसंख्या असलेल्या आर्णी शहरात सध्या अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच सध्या डेंग्यू, मलेरियाचा ...

आर्णी : ५० हजार लोकसंख्या असलेल्या आर्णी शहरात सध्या अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच सध्या डेंग्यू, मलेरियाचा आजारही पसरत आहे. तरीही प्रशासन साफसफाईकडे दुर्लक्ष करीत आहे. कारण कचरा उचलण्यासाठी यंत्रणाच नाही.

आर्णी शहरात साथरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ग्रामीण रुग्णालय, खासगी रुग्णालयात दररोज रुग्ण येत आहेत. प्रत्येक कुटुंबात एखादा रुग्ण, अशी भयावह परिस्थिती आहे. नगरपरिषदेकडून यावर पाहिजे तशी उपाययोजना होताना दिसत नाही. गंभीर म्हणजे, आर्णी नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नाही. नगरपरिषदेकडून कचरा उचलण्यासाठी सात मालवाहू गाड्या आहेत. यापैकी दोन गाड्या बंद आहे. पाच गाड्यांच्या भरवशावर शहरातील कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. यातही या पाच वाहनांवर चालक नाहीत. सफाई कर्मचारीच या गाड्या चालवीत आहेत. त्यामुळे दररोज कचरा उचलला जात नाही. एकदा कचरा उचलला की, तिथे परत तीन ते चार दिवस गाडी फिरकत नाही. शहरात अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई नाही, कचराही रस्त्यावर पडलेला आहे. डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी यावर ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे.

कोट

नगरपरिषदेकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा वापर करून दररोज कचरा उचलणे सुरू आहे. गाड्या कमी असल्याने प्रत्येक भागात दररोज कचरा उचलणे शक्य होत नाही.

- मंगला रमेश ठाकरे, आरोग्य सभापती, नगर परिषद आर्णी

कोट

शहरात साथरोग मोठ्या प्रमाणावर आहे. रुग्णालयात दररोज मेंदूज्वर, डेंग्यू, मलेरिया, निमोनिया अशा विविध आजारांचे शंभरावर रुग्ण येत आहेत. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

- डॉ. सुनील भवरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय आर्णी

200921\img_20210920_140209.jpg

आर्णीत शहरात पडलेला कचरा