शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या जाचामुळे ढळतोय शेतकऱ्यांचा संयम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 22:57 IST

जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातील शेतशिवार चोरांपासून सुरक्षित नाही. काही दिवसांपूर्वी कधी तरी शिवारात चोरीची घटना घडत होती. आता मात्र हा प्रकार नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल यावर लावलेले मोटारपंप, त्याचे केबल, स्टार्टर हे सर्रास चोरीला जात आहे. चोरटे अधिकच बिनधास्त झाले असून तुषार संच, ठिबक संचाचे पाइपसुद्धा उखडून घेऊन जात आहे. रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यावर हे नवे संकट उभे ठाकले आहे.

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाशी दोन हात करून शेतकरी आपले काळे शिवार हिरव करतो. अन्नदाता म्हणून वाट्याला येणारी दु:ख व कष्ट मुकाट सोसतो. व्यवस्थाही त्याची वारंवार कसोटी पाहते. अशा शेतकऱ्यांचा आता संयम सुटायला लागला आहे. शेती साहित्य, धान्य, जनावरे चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. हे नवे संकट परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात काठी घेतली तर अघटित घडते, अशीच घटना बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे घडली. हकनाक शेतकरी खुनाचे आरोपी झाले. जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातील शेतशिवार चोरांपासून सुरक्षित नाही. काही दिवसांपूर्वी कधी तरी शिवारात चोरीची घटना घडत होती. आता मात्र हा प्रकार नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल यावर लावलेले मोटारपंप, त्याचे केबल, स्टार्टर हे सर्रास चोरीला जात आहे. चोरटे अधिकच बिनधास्त झाले असून तुषार संच, ठिबक संचाचे पाइपसुद्धा उखडून घेऊन जात आहे. रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यावर हे नवे संकट उभे ठाकले आहे. गोठ्यातील गाय, म्हैस, बैल ही जनावरेसुद्धा सुरक्षित नाहीत. आता सध्या रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत आहेत. रब्बीच्या हंगामात सिंचनासाठी मोटारपंप व तुषार संचाची गरज भासते. यंदा मुसळधार कोसळलेल्या पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांची पुरती दैना केली. झालेले नुकसान निघणार नाही, मात्र पुढील काही दिवस व्यवहार चालविता येईल इतके उत्पन्न रब्बीतून मिळावे या आशेने शेतकरी पुन्हा कष्ट उपसायला तयार झाला आहे. त्याला चोरट्यांकडून खोडा घातला जात आहे.  पोलिस ठाण्यांमध्ये दररोज कृषी साहित्य चोरीच्या तक्रारी  दाखल होतात. पोलिसांकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. चोरी गेलेल्या कृषी साहित्याची किंमत पोलिसांच्या लेखी फार कमी आहे. मात्र हंगामात हातचे अवजार निघून गेले तर किती नुकसान होते, काय अडचणी सोसाव्या लागतात, हे शेतकऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा चोरट्यांवरील राग वाढला आहे. हाती लागला तर बेदम मारहाणीत शेतकरी आरोपी होत आहेत. मादणी येथे सोयाबीन चोरीच्या संशयातूनच एकाला शिवारात नेऊन हातपाय बांधून बदडला. यात त्याचा जीव गेला. तिघे जण खुनाच्या गुन्ह्यात आरोपी झाले. अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी पोलिसांनी कृषी साहित्य चोरणाऱ्यांचा कडक बंदोबस्त करणे गरजेचे आहे.  

शेतकरी म्हणतात, पोलिसांचा धाक नाही 

माझ्या शेतातून आतापर्यंत सात मोटारपंप चोरीला गेले. चारवेळा तक्रार दिली. पोलिसांची   काहीच कारवाई नाही. त्यानंतर तीनवेळा मोटारपंप चोरीस जाऊनही तक्रार केली नाही. चोरट्यांवर पोलिसांचा  धाक नाही. आम्ही शेतकरी भीतीच्या सावटात जगत आहोत. तक्रार घेण्यासही पोलिस टाळाटाळ करतात.- संजय रावेकर, शेतकरी, कळंब

दोनवेळा मोटारपंप व शेतीपयोगी साहित्य चोरीला गेले. शेतातील पाइप पोलिसांनी तपासाकरिता नेले. आता तेही द्यायला तयार नाहीत. मोटारपंप चोरीला जाऊ नये, असे वाटत असले तर शेतात जाऊन झोपत जा, असा उलट सल्ला पोलीस देतात.आता आम्ही दाद तरी कोणाकडे मागायची.- ज्ञानेश्वर केशव लोखंडे, शेतकरी, कळंब

शेतातून तीन मोटार पंपाची चोरी झाली. प्रत्येक वेळा तक्रार दिली. काहीच उपयोग झाला नाही. उलट पोलिस म्हणतात, सुगावा लागला तर सांगा. माहिती दिली तर तपास करीत नाहीत. वारंवारच्या चोरीमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. भीतीच्या सावटात जगत आहोत.- प्रवीण राऊत शेतकरी, कोठा

आजूबाजूच्या शेतातील मोटारपंप चोरीस जात आहे. त्यामुळे आम्हाला आमचे मोटारपंप सुरक्षित राहील की नाही, याची काळजी असते. वारंवार शेतात चकरा माराव्या लागत आहे. यामध्ये अधिकचा वेळ जातो. मोटार चोरांची टोळी पकडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. - प्रल्हाद पांडुरंग झामरे शेतकरी, बोरीमहल

 

टॅग्स :Thiefचोर