शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; येत्या पाच दिवसात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 16:54 IST

Yavatmal : अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी बैठक बोलावली. ही बैठक सकारात्मक असली तरी बहुतांश मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी पुत्रांची जिल्हा प्रशासनासोबत बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक प्रश्न निकाली काढण्यात आले; तर अनेक प्रश्न धोरणात्मक असल्याने त्यावर राज्यस्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. 

सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, अतिवृष्टीची पूर्णता नुकसानभरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला मजबूत कंपौंड यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृष्णा पुसनाके, सचिन मनवर व कृषी अभ्यासक प्रा. पंढरी पाठे यांनी यवतमाळ येथे आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन केले होते. 

या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे, अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, अॅड. जयसिंग चव्हाण यांसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थितीत होते. 

तब्बल दीड तास ही बैठक चालली. या बैठकीत प्रा. पंढरी पाठे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत. जंगली जनावरांच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी शेतीला मजबूत कंपौंडच्या योजनेचा प्रस्ताव उपवनसंरक्षक यांच्या माध्यमातून कॅबिनेटकडे पाठवू, असे सांगण्यात आले. यावेळी विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांनी आपले मत मांडले. 

यावेळी माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रा. निनाद सुरपाम, ऋषिकेश सराफ, प्रज्ज्वल तुरकाने, नितीन मिर्झापुरे, तर सहकारी म्हणून शेतकरी प्रकाश कांबळे, राहुल भानावत, अनिल चवरे, अभय अनासाने, अनिकेत हांडे, प्रशांत कुटे यांची उपस्थिती होती. 

मध्यप्रदेशाप्रमाणे यवतमाळात आंदोलन मागण्या पदरात पडत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत समोरील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मध्यप्रदेशमध्ये जसे आंदोलन सुरू आहे, तसेच आंदोलन महाराष्ट्रातही होणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :YavatmalयवतमाळfarmingशेतीFarmerशेतकरी