शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

केंद्राला पडलाय प्रश्न; ३०% पोरं जेवत का नाही? तांदूळ तर रोज संपतोय! शालेय पोषण आहार योजनेवर प्रश्नचिन्ह

By अविनाश साबापुरे | Published: March 28, 2024 4:37 PM

यवतमाळ : शालेय पोषण आहाराचा तांदूळ रोज संपत जातो. पण रोज जेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र ५० ते ७० टक्केच ...

यवतमाळ : शालेय पोषण आहाराचा तांदूळ रोज संपत जातो. पण रोज जेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र ५० ते ७० टक्केच असते. याबाबतचे वास्तव केंद्र सरकारच्या ‘मीड डे मील’ पोर्टलवर उघड झाले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शाळांमध्ये हा प्रकार होत असल्याचे पुढे आले आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक शाळांमध्ये पोषण आहार वाटपच होत नसल्याचे पोर्टलवरील आकडेवारी सांगते. तर दुसरीकडे, आम्ही सर्व विद्यार्थ्यांना जेवण देतो, मात्र आकडेवारी भरण्याबाबत विलंब होतो, असा दावा शाळांकडून करण्यात आला आहे.प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज आहार शिजवून दिला जातो. हा आहार किती विद्यार्थ्यांना दिला गेला, याची संख्या रोजची रोज ‘एमडीएम’ पोर्टलवर भरणे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. रोज भरण्यात आलेली ही आकडेवारी राज्यस्तरावरून केंद्र सरकारच्या ‘ऑटोमोटेड मॉनिटरिंग सिस्टिम’वर पाठविली जाते.परंतु, आता पोषण आहारासाठी पात्र असलेल्या शाळा आणि ‘ऑटोमोटेड मॉनिटरिंग सिस्टिम’वर माहिती भरणाऱ्या शाळांची पडताळणी केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. जवळपास ४० टक्के शाळा आहार वाटपाची आकडेवारी या पोर्टलवर भरत नसल्याचे दिसून आले. देशात १० लाख ५५ हजार शाळांपैकी १ लाख ६० हजार शाळांनीच माहिती दिली आहे. तर महाराष्ट्रातील ८५ हजार १०६ शाळांपैकी केवळ ६२ हजार १४८ शाळांनीच आहार वाटप केल्याची माहिती दिली आहे. परंतु, शाळा आकडेवारी भरत नाही, की आहाराच वाटप करीत नाही, अशी शंका व्यक्त करत केंद्राने राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाला विचारणा केली आहे.ही आकडेवारी रोज भरणे आवश्यक असताना महिनाभराची आकडेवारी एकदाच ‘बॅकडेटेड’ भरण्याचा पायंडा काही शाळांनी पाडला आहे. तर काही शाळांनी चक्क रविवारीही आहार दिल्याची नोंद या पोर्टलवर केली आहे. त्यामुळे आहार वाटपात कुठे तरी घोळ होत असल्याच्या शंकेला बळ मिळाले आहे.संचालकांनी दिले पडताळणीचे आदेशमहाराष्ट्रात २८ मार्च रोजी एकाही शाळेने एमडीएम पोर्टलवर पोषण आहाराची माहिती भरलेली नाही. तर मागील संपूर्ण आठवडाभरातील आकडेवारीनुसार, राज्यात केवळ ७० टक्के शाळाच माहिती भरत आहेत. २७ मार्च रोजी केवळ ७३ टक्के शाळांनी आहार वाटप केला. याची दखल घेत केंद्राने शिक्षण संचालनलयाला विचारणा केली आहे. त्यामुळे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रत्येक शाळा रोजची माहिती रोजच भरते की नाही, याची पडताळणी करण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना २६ मार्चला दिले आहेत.जिल्हा : एकूण शाळा : माहिती देणाऱ्या शाळाअहमदनगर : ४५३६ : ४००७ (८८.३४ टक्के)अकोला : १४१६ : १०४७ (७३.९४ टक्के)अमरावती : २३८२ : १९७७ (८३ टक्के)छत्रपती संभाजीनगर : २९८६ : २२१३ (७४.११ टक्के)भंडारा : ११२१ : ९६९ (८६.४४ टक्के)बीड : ३१८२ : २४२६ (७६.२४ टक्के)बुलडाणा : २००६ : १६२० (८०.७६ टक्के)चंद्रपूर : २००४ : १५३२ (७६.४५ टक्के)धुळे : १६६७ : १३५३ (८१.१६ टक्के)गडचिरोली : १७५६ : ११०९ (६३.१५ टक्के)गोंदिया : १३४० : ८५९ (६४ टक्के)हिंगोली : १०२७ : ७९९ (७७.८ टक्के)जळगाव : २७५८ : २२८४ (८२.८१ टक्के)जालना : १८९६ : १४३२ (७५.५३ टक्के)कोल्हापूर : ३०२८ : २३५४ (७७.७४ टक्के)लातूर : २१९८ : १७०३ (७७.४८ टक्के)मुंबई : ५७६ : १२७ (२२ टक्के)मुंबई उपनगर : १३५४ : १४४ (१०.६४ टक्के)नागपूर : २७२५ : २१२९ (७८.१३ टक्के)नांदेड : २९८४ : १९०३ (६३.७७ टक्के)नंदूरबार : १६९५ : १९९ (११.७४ टक्के)नाशिक : ४४१२ : ३५४६ (८०.३७ टक्के)धाराशिव : १५३२ : १२५९ (८२.१८ टक्के)पालघर : २३६८ : १८३० (७७.२८ टक्के)परभणी : १५७८ : १२५३ (७९.४ टक्के)पुणे : ५३६४ : ३६३३ (६७.७३ टक्के)रायगड : ३०१५ : २२३८ (७४.२३ टक्के)रत्नागिरी : २८४५ : १९९१ (६९.९८ टक्के)सांगली : २५१९ : २०१२ (७९.८७ टक्के)सातारा : ३४२७ : २३८९ (६९.७१ टक्के)सिंधुदुर्ग : १६०३ : १३६८ (८५.३४ टक्के)साेलापूर : ४०७१ : ३०९७ (७६.०७ टक्के)ठाणे : २६४३ : १३२९ (५०.२८ टक्के)वर्धा : १२२० : ९०३ (७४.०२ टक्के)वाशिम : ११०९ : ८९८ (८०.९७ टक्के)यवतमाळ : २७६३ : २२१६ (८०.२ टक्के)एकूण : ८५१०६ : ६२१४८ (७३.०२ टक्के)

भारतभरात आहार वाटपाची बोंबएकाही राज्यात १०० टक्के शाळांमध्ये आहार वाटप केल्याची आकडेवारी पोर्टलवर दिली गेलेली नाही. कोणत्या राज्यात किती टक्के शाळांमध्ये वाटप झाले त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे : अरुणाचल प्रदेश ७४ (२.५६), आसाम १६९३२ (३८.७४), बिहार ३५२३८ (५०.८८), चंदीगड ४९ (४०.८३), छत्तीसगड ३०६८९ (६९.१४), गोवा ७२७ (५९.११), गुजरात २९३७९ (९०.८), हरियाणा ५३१८ (३५.९८), हिमाचल प्रदेश ४६५९ (३०.३७), जम्मू काश्मिर ९३१७ (४२.८२), झारखंड २३५३१ (६६.६३), कर्नाटक २९७६६ (५७.०४), केरळ ६१०२ (५०.८९), लद्दाख २५ (३.१५), मध्य प्रदेश १३३९७ (१२.६९), महाराष्ट्र ६२१४८ (७३.०२), मणीपूर ५५७ (१६.९२), मेघालय १३४२ (१२.२२), मिझोराम ३४० (१३.८१), नागालँड ३७६ (१९.६४), ओडिशा २९०७१ (५७.६५), पंजाब १७१११ (८७.२६), राजस्थान ८००९ (१२.०७), सिक्कीम ३०७ (३५.५७), तमीळनाडू २७०८७ (६३.१५), तेलंगणा ११५३८ (४२.६१), आंध्र प्रदेश ४३६८३ (९९), त्रिपुरा ११९४ (२६.९), उत्तर प्रदेश १३८३०० (९७.६१), उत्तराखंड ४६१८ (२७.६६), पश्चिम बंगाल ७६२५४ (९३.१९) एकूण भारत ६२७४९२ (५९.४५)

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीCentral Governmentकेंद्र सरकार