शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

थकीत कर्जदारांची दोन कोटींची मालमत्ता बँकेने घेतली ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 21:10 IST

बाबाजी दाते महिला बँकेच्या थकित कर्ज प्रकरणात एनपीए मर्यादेच्या बाहेर गेला. यामुळे आरबीआयने या बँकेचा बँकिंग परवानाच रद्द केला आहे. या ठिकाणच्या कामकाजाची धुरा अवसायकाकडे सोपविण्यात आली आहे. अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी थकीत कर्जदार आणि जमानतदारांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम हाती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाबाजी दाते महिला बँकेच्या अवसायकांनी  थकीत कर्जदारांकडून सक्तीने वसुलीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत थकबाकीदारांना दोन नोटिसा बजावल्यानंतरही त्यांनी  रकमेचा भरणा केला नाही. अशा कर्जदार सदस्यांची मालमत्ता सांकेतिक ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात सहा कर्जदारांच्या दोन कोटी २० लाख रुपयांच्या मालमत्ता अवसायकांनी सांकेतिक ताब्यात घेतल्या आहे. यामुळे कर्जदारांचे धाबे दणाणले आहे.बाबाजी दाते महिला बँकेच्या थकित कर्ज प्रकरणात एनपीए मर्यादेच्या बाहेर गेला. यामुळे आरबीआयने या बँकेचा बँकिंग परवानाच रद्द केला आहे. या ठिकाणच्या कामकाजाची धुरा अवसायकाकडे सोपविण्यात आली आहे. अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी थकीत कर्जदार आणि जमानतदारांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम हाती घेतली आहे.बँकेकडून एक हजार १३ सभासदांनी २६७ कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यावर २०८ कोटींचे व्याज झाले आहे. यामुळे अवसायकांना ४७५ कोटी रुपयांची वसुली थकबाकीदारांकडून करायची आहे. अशा थकबाकीदार कर्जदारांना बँकेने ठरावीक कालावधीत दोन नोटीस बजावल्या आहेत. या नोटिशीला कर्जदारांनी कुठलेच उत्तर दिले नाही. यामुळे सरफेसी कायदा २००२ नुसार अवसायकांनी अशा प्रकरणात थकबाकीदार कर्जदारांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई बँकेने सुरू केली आहे. दोन नोटीसला उत्तर न दिलेल्या शहरातील सहा थकीत कर्जदारांच्या मालमत्ता बँक अवसायकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या कर्जदार सभासदांकडे दोन कोटी २० लाख ५७ हजार १८५ रुपयांची थकबाकी आहे. मालमत्ता ताब्यात घेतलेल्या ठिकाणी बँकेने संबंधित मालमत्तेसंदर्भात कर्जदार आणि गहाणतदाराशी कुठलाही व्यवहार करू नये, अशा सूचना लावल्या आहेत. आता   टेंडर प्रक्रिया बोलावून लिलावाची प्रक्रिया होणार असल्याचे संकेत आहेत. 

१०२६ थकबाकीदारमहिला बँकेकडून कर्ज घेणाऱ्या अनेक सभासदांनी काही मोजके हप्त भरले. त्यानंतर कर्जच भरले नाही. यातून बँकेचा एनपीए मोठ्या प्रमाणात वाढला. बँक डबघाईस आली. वसुली न झाल्याने बँकेतील ठेवीदारांचे पैसेही अडचणीत आले. लिलावातून मिळणाऱ्या पैशातून ठेवीदारांच्या ठेवीच्या रकमाही परत होणार आहेत.

बँकेने थकबाकीदार सभासदांना नियमानुसार दोन नोटिसा बजावल्या आहेत. या नोटीसनंतर त्यांना अवधी दिला. यानंतरही उत्तर दिले नाही. अशा प्रकरणात सरफेसी कायदा २००२ नुसार मालमत्ता सांकेतिक ताब्यात घेतल्या जात आहेत. - नानासाहेब चव्हाण, अवसायक, महिला बँक

या कर्ज बुडव्यांना अवसायकाचा दणकाकर्ज वसुली व्हावी यासाठी अवसायकांनी कठोर पावले उचलणे सुरू केले आहे. ७१ लाख ५६ हजार कर्ज थकविणारे विक्रमसिंग दालवाला, आठ लाख ७१ हजार थकविणाऱ्या सोनाली बेलगमवार, मेहरबाबा एन्टरप्रायजेसच्या मंगला दोंदल, माताेश्री एजंसीचे विक्रांत कुटेमाटे, महेश माॅड्युलर किचनचे महेश कुटेमाटे, रहाणे बिल्डींग मटेरियलच्या संचालकांवर कारवाई केली. 

 

टॅग्स :bankबँक