शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यात डेंग्यू आजाराचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

इडिस इजिप्‍ती या डासाने चावा घेतल्यानंतर डेंग्यूसारख्या आजाराची बाधा होते. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यातून इडिस इजिप्‍ती डासांची संख्या वाढते. गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याचे डबके साचले असून, त्यातून इडिस इजिप्‍ती डासांची उत्पत्ती होत आहे. इडिस इजिप्‍ती हा एक लहान, काळा डास असून, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याचा आकार अंदाजे ५ मिलिमीटर असतो.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कोरोनाचा कहर अद्याप संपलेला नसताना वणी तालुक्यात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. सद्यस्थितीत या रुग्णांची संख्या शेकडोंच्या घरात असून, दररोज उपचारासाठी वणीतील खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे. बदलत्या वातावरणामुळे तालुक्यात तापाची साथ पसरली असून, त्यातच डेंग्यूसारख्या आजाराची देखील बाधा होत आहे. त्यामुळे वणीचा आरोग्य विभाग सध्या अलर्ट मोडवर काम करताना दिसत आहे. इडिस इजिप्‍ती या डासाने चावा घेतल्यानंतर डेंग्यूसारख्या आजाराची बाधा होते. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यातून इडिस इजिप्‍ती डासांची संख्या वाढते. गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याचे डबके साचले असून, त्यातून इडिस इजिप्‍ती डासांची उत्पत्ती होत आहे. इडिस इजिप्‍ती हा एक लहान, काळा डास असून, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याचा आकार अंदाजे ५ मिलिमीटर असतो. हा शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास दिवसा, सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. डेंग्यू हा मादी डासांच्या चाव्याद्वारे पसरतो, असे संशोधनातून आढळले आहे. गेल्या काही दिवसांपासून वणी तालुक्यात डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. वणी तालुक्यातील भुरकी येथे एकाच दिवशी डेंग्यूचे तब्बल आठ रुग्ण आढळून आले. यासोबतच राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वांजरी येथेही काही रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. यासोबतच तालुक्यातील इतर ग्रामीण भागात देखील तापाचे रुग्ण आढळत असून, त्यापैकी अनेक जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निदान होत आहे. कोरडा दिवस पाळण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन- इडिस इजिप्ती हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. घरातील झाडाची कुंडी, अडगळीतील टायर, कूलरची टाकी आदी इडिस इजिप्ती डासांच्या उत्पत्तीची स्थाने आहेत. त्यामुळे स्वच्छ पाणी जमा होऊ नये, यासाठी ती जागा आठवड्यातून एकदातरी कोरडी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.तपासणी केल्यानंतर दररोज किमान आठ ते दहा डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात लहान बालकांचा देखील समावेश आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. डॉ. सुनील जुमनाके, बालरोगतज्ज्ञ, वणी.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य