शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

By admin | Updated: October 11, 2014 02:19 IST

सुरुवातीला शिवसेनेकडून विक्रमी मताधिक्याचे अंदाज वर्तविण्यात आलेल्या दिग्रस मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने कडवे आव्हान उभे केले आहे.

सुरुवातीला शिवसेनेकडून विक्रमी मताधिक्याचे अंदाज वर्तविण्यात आलेल्या दिग्रस मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने कडवे आव्हान उभे केले आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत.या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा व काँग्रेस या चार प्रमुख पक्षात स्पर्धात आहे. जातीय समीकरण व मतविभाजन यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. ज्या उमेदवाराला या फॅक्टरचा फायदा होईल त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.मतदारसंघाच्या फेररचनेपूर्वी जुन्या दारव्हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. १९६७ आणि १९७८ या दोन टर्मची निवडणूक सोडली तर १९६२ पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. माणिकराव ठाकरे यांनी सलग २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला. नंतर या मतदारसंघाची फेररचना झाली. दिग्रस, दारव्हा, नेर हे तालुके मिळून दिग्रस मतदारसंघ झाला. २००९ मध्ये संजय देशमुख यांचा संजय राठोड यांनी पराभव केला, दोनही टर्ममध्ये सत्ता नसूनही स्थानिक विकास निधी व अन्य निधी राठोड यांनी खेचून आणला. चांगला जनसंपर्क हा त्यांचा प्लस पॉर्इंट समजला जातो. गेल्या दहा वर्षात या भागात आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेचे चांगले नेटवर्क तयार केले. त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होताना दिसतो आहे. या निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी फार पूर्वीपासून तयारी केली होती. आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्यावर होता. परंतु गृहमतदारसंघ असतानासुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा त्यांचे पूत्र राहुल ठाकरे हे या ठिकाणी लढण्यास उत्सुक नव्हते. प्रमुख नेत्यांच्या अशा या भूमिकेमुळे या मतदारसंघात निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र सुरुवातीला होते. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडी आणि महायुती तुटली. भाजपने प्रा.अजय दुबे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने दुसऱ्या फळीतील देवानंद पवार यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने वसंत घुईखेडकर यांना संधी दिली. या मतदारसंघावर बंजारा व कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. परंतु गेल्या दोनही निवडणुकीत कुणबी-मराठा उमेदवार असतानाही संजय राठोड यांना बंजारासह कुणबी व इतर मतांचा पाठिंबा मिळाला होता. पण यावेळी राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर आव्हान उभे केले. निवेदने, बॅनर, पोस्टर रॅली, कॉर्नर सभा, डोअर टू डोअर प्रचार यावर भर दिला जात आहे शिवसेनेला मोठ्या सभांची प्रतीक्षा आहे. राष्ट्रवादीने अजित पवार, खासदार तारीक अन्वर, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांच्या सभा घेतल्या. उर्वरित दोन प्रमुख उमेदवारही चांगला जोर लावून आहे. भाजपाचे प्रा.अजय दुबे गावागावात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.