शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेत १६ कोटींच्या काँक्रीट रस्ते निविदा मंजूर

By admin | Updated: October 2, 2016 00:15 IST

नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सिमेंट काँक्रीटच्या रस्ता निर्मितीसाठी प्राप्त निविदांना मंजुरी देण्यात आली.

यवतमाळ : नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सिमेंट काँक्रीटच्या रस्ता निर्मितीसाठी प्राप्त निविदांना मंजुरी देण्यात आली. १६ कोटी ५० लाखांच्या या निविदा मंजूर करण्यात आल्या. याशिवाय या बैठकीत ४५ विषय एकमुखाने मंजूर करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता आयोजित बैठक काही मिनिटातच आटोपली. स्थायी समितीच्या बैठकीत प्रामुख्याने कार्योत्तर मंजुरीसाठीच अनेक विषय ठेवण्यात आले होते. यात प्रामुख्याने गणपती, दुर्गादेवी विसर्जनासाठी विहिरींची साफसफाई, पावसाळ्यापूर्वी अंतर्गत रस्त्यावरील ह्यूम पाईप बदलविणे अथवा त्याची साफसफाई करणे या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. याशिवाय दलित वस्ती अंतर्गत तलावफैल येथील झेंडा चौक ते बोरगाव रोड आणि तेथून रिंगरोड चौकापर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. याशिवाय दलित सोसायटीतील काँक्रीट नाली, प्रभाग क्र. ७ मध्ये क्राँकीट नाली, वैशिष्ट्यपूर्ण कामांतर्गत आठवडी बाजार परिसरात दहा कोटींचे क्राँकीट रस्ते व इतर विकासात्मक कामे यासाठी प्राप्त ई-निविदांना मंजुरी देण्यात आली. १४ व्या वित्त आयोगातून शहरात बायोगॅस प्लाँटची उभारणी करण्यास निविदा मंजूर करण्यात आली. नगरपरिषद क्षेत्रात नव्याने समाविष्ठ झालेल्या भागातील मतदान केंद्र इमारतींची किरकोळ दुरुस्ती, आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प तयार करण्याला मंजुरी देण्यात आली. शहरातील वाढीव भागात गाजर गवत, झाडे झुडूपे कापण्यासाठी कटर मशीन खरेदी केली जाणार आहे. महत्वपूर्ण विषय एकमुखाने मान्य करण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)