दहा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 20:30 IST2018-10-17T20:29:13+5:302018-10-17T20:30:27+5:30
शासनाने बुधवारी राज्यातील दहा अपर पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

दहा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या
यवतमाळ : शासनाने बुधवारी राज्यातील दहा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. नागपूर सीआयडीचे संदीप भाजीभाकरे यांची मुंबईत उपायुक्त पदावर, नाशिक ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांची रत्नागिरीला समकक्ष पदावर बदली करण्यात आली.
याशिवाय आठ अप्पर अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे. त्यामध्ये अहमदनगरचे जयंत मीना, सोलापूरच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले, धुळ्याचे विवेक पानसरे, साताऱ्याचे विजय पवार, अकोल्याचे प्रशांत वाघुंडे, रत्नागिरीचे नितेश घट्टे आणि मंत्रालयातील सुरक्षा उपायुक्त प्रशांत खैरे यांचा त्यात समावेश आहे. यातील जयंत मीना हे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आहेत.