शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

यवतमाळात दहा देशी पिस्तूल जप्त, सात आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 6:43 PM

यवतमाळ व पुसदमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा देशी पिस्तूल, १६ जिवंत काडतुसं जप्त केली असून, या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात यवतमाळ व पुसदमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा देशी पिस्तूल, १६ जिवंत काडतुसं जप्त केली असून, या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये अमरावती, अकोल्यातील युवकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ऐन दुर्गोत्सव काळात अतिसंवेदनशील पुसद शहरातून तब्बल नऊ देशी पिस्तूल आढळून आल्याने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. दुर्गा विसर्जनादरम्यान कुठे घातपाताची, सामाजिक शांततेला आव्हान देण्याची ही तयारी तर नव्हे ना, या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहे. अकोल्याचा अभिजित ऊर्फ पिंटू रामभाऊ जगताप (रा. झोडगा, ता.बार्शी टाकळी) हा पुसदमध्ये देशी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, नीलेश शेळके पथकासह चार दिवसांपासून पुसदमध्ये ठाण मांडून होते.ठरल्यानुसार अभिजित हा देशी पिस्तूल घेऊन पुसदच्या उमरखेड मार्गावरील श्रीराम पार्कमध्ये रविवारी आला. तेथे चौघात पिस्तूल विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच सापळा लावून असलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. अभिजित जगताप शिवाय जय केशव बाबर (३०) रा.शिवाजी वॉर्ड पुसद, राकेश शरदसिंग बयास (३८) रा.नवीन पुसद, लिलाधर ऊर्फ बबलू विजय मळघने (२१) रा.मरसूळ ता.पुसद या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून देशी बनावटीच्या नऊ पिस्टल, १६ जिवंत काडतूस आणि चार मोटरसायकली असा सात लाख २६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुसद शहर ठाण्यात आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल केला. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तत्पूर्वी शुक्रवारी टोळीविरोधी पथकाने यवतमाळातील आरटीओ आॅफिस परिसरातून एक देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले. यात तीन जणांना अटक केली. अजहर ऊर्फ आझाद खान वाहीद खान पठाण ऊर्फ बाबा पटेल (३३) रा.झेंडा चौक दिग्रस, शाहेजाद खान शब्बीर खान (२५) रा.गुलिस्तानगर अमरावती, जावेद अहमद खुर्शिद अहमद (३३) रा.बाबा ले-आऊट, यवतमाळ अशी आरोपींची नावे आहे. अजहर हा सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्याकडून एक लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींची तीन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आल्याचे एसपी एम राज कुमार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, एलसीबीचे प्रमुख मुकुंद कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर उपस्थित होते. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक फौजदार नीलेश शेळके, ऋषी ठाकूर, संजय दुबे, योगेश गटलेवार, साजीद शेख, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशीष गुल्हाने, विनोद राठोड, प्रवीण मेंगर, आकाश सहारे, श्रीधर शिंदे, जयंत शेंडे, यशवंत जाधव, गौरव ठाकरे, नीलेश पाटील यांनी सहभाग घेतला. स्वसंरक्षणासाठी पिस्तूल खरेदीपुसदमध्ये नऊ देशी पिस्टलसह अटक करण्यात आलेले सर्व आरोपी चांगल्या कुटुंबातील व आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. प्रत्येकाचा स्वतंत्र व्यवसाय आहे. केवळ स्वसंरक्षणासाठी हे पिस्टल खरेदी केल्याची कबुली आरोपींनी दिली. यापूर्वी त्यांच्यावर इतर कुठलेही गुन्हे नसल्याचे सांगण्यात आले. पिस्तूल तस्करीचे तार मध्य प्रदेशातजिल्ह्यात लगतच्या मध्य प्रदेशातून देशी पिस्टल पुरविले जाते. यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात टोळीविरोधी पथकाने आठ पिस्टल पकडले होते. त्यात मध्य प्रदेशातील आरोपींना अटक केली होती. पुसदच्या प्रकरणातही मध्य प्रदेशाच्या बैतुल जिल्ह्यातील तार जुळले असल्याचे सांगण्यात येत आहे.